तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचा मुलुंड विधानसभा, मतदारसंघ क्रमांक – १५५विद्यमान आमदार : सरदार तारासिंग
पराभूत उमेदवार : चरणसिंग सप्रा, काँग्रेस – २८,५४३
मतदारांची संख्या
पुरुष – १,५५,९०३
महिला – १,४२,३३६
एकूण मतदार – २,९८,२४२
मुलुंड हा मतदारसंघ उत्तर पूर्व मुंबईमध्ये येतो मुंबई पूर्वेकडील प्रवेशद्वार असलेल्या मुलुंड मतदारसंघामध्ये उच्चभ्रू, मध्यम आणि गरीब अशी संमिश्र वस्ती आहे. गुजराती, मराठी आणि उत्तर भारतीय अश्या स्वरुपात मतदार मुलुंडला आहेत. मुलुंड विधानसभा क्षेत्रात १९९९ पासून भाजपचे आमदार सरदार तारासिंग कार्यरत आहेत. पालिका निवडणुकीत भाजपचे ६ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील एका नगरसेविकेचे पद जात प्रमाणपत्रातील त्रुटीमुळे रद्द करण्यात आले होते. त्या जागी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी मिळाली.मतदारसंघात एकूण २८९ मतदान केंद्र आहेत.तारासिंग यांचे वय झाले असल्याने, त्यांच्याऐवजी नवीन चेह-याला संधी मिळावी म्हणून पदाधिकाºयांमध्ये धुसफुस सुरू आहे. आमदारकीचे प्रबळ दावेदार कोटक खासदार झाल्याने, नगरसेवक, पदाधिकारी आमदारकीच्या तयारीला लागले आहेत. मुलुंडमधून भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे, पदाधिकारी विनोद कांबळे, पी.एस. नागराजन तसेच युवानेते विरल शहा यांनी उमेदवारीसाठी धडपड सुरू केली आहे.
सरदार तारासिंग
विद्यमान आमदार – सरदार तारासिंग, भाजप
सामाजिक कार्यामधून सरदार तारासिंग यांनी स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुलुंड मतदारसंघात रस्ते, पिण्याचे पाणी, शौचालये, बसथांबे, उद्यानांचा विकास अशी अनेक कामे तारासिंग यांनी केली आहेत. तसेच, तारासिंग मानव सेवा ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केलेल्या मोफत अन्नछत्रामुळेही त्यांना सामान्यांचा पाठिंबा मिळतो. त्याच पाठिंब्याच्या जोरावर १९९९पासून गेल्या सलग ४ विधानसभा निवडणुकांमध्ये ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्याआधी १९८४ ते १९९९ या कालावधीत ते मुंबई महानगर पालिकेवर सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून देखील निवडून आले आहेत. राज्यपालांनी त्यांचा उत्कृष्ट नगरसेवक म्हणून सन्मान देखील केला आहे.तारासिंग मात्र कोणीही आले तरी आपणच निवडणूक लढविणार यावर ठाम आहेत. काँग्रेसमधून चरणसिंग सप्रा पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. तर वंचितच्या उमेदवाराचा शोध अजूनही सुरू आहे. मनसेचे चित्रच स्पष्ट नसल्याने त्यांचे उमेदवार पक्षाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून
आहेत.
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) सरदार तारासिंग, भाजप – ९३,८५०
२) चरणसिंग सप्रा, काँग्रेस – २८,५४३
३) प्रभाकर शिंदे, शिवसेना – २६,२५९
४) सत्यवान दळवी, मनसे – १३,४३२
५) नंदकुमार वैती, राष्ट्रवादी – ४८८०
नोटा – १७४८
मतदानाची टक्केवारी – ५७.४६ %

No comments:

Post a Comment