तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

गडकिल्ल्यांचे हॉटेल करण्याच्या निर्णया विरूध्द परळीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची निदर्शने
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.07........महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांनी स्वतःचे रक्त सांडुन निर्माण केले गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी भाड्याने देण्याच्या फडणवीस सरकारच्या जुलमी निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने परळी शहरात आज विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिव्र निदर्शने करण्यात आली. 

शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून या निदर्शनाच्या आंदोलनाला सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, किल्ल्यांचे हॉटेल करणार्‍या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी संपुर्ण परिसर दुमदुमून टाकत कार्यकर्त्यांनी जवळपास 1 तास निदर्शने करत रस्ता रोखुन धरला. 

या आंदोलनात माजी उपसभापती विष्णुपंत देशमुख, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, रवि मुळे, महादेव रोडे, अनंत इंगळे, दत्ताभाऊ सावंत, दिनेश गजमल, शंकर कापसे, नितीन पाटील, अल्ताफ पठाण, शेख हसन, बळीराम नागरगोजे, रामदास कराड, रवि आघाव, जयदत्त नरवाडे, ज्ञानेश्‍वर होळंबे, मंगेश मुंडे, बालाजी दहिफळे, आकाश डोंगरे, रवि सोरडगीर, पवन फुटके, सतिश गंजेवार, भगवान पौळ, गफ्फार काकर, अमोल सुर्यवंशी, सय्यद अलोद्दीन, भागवत गित्ते, बबन जंगले, सुमित कलमे, मुख्तार शेख, युनूसभाई डिघोळकर, पद्माकर शिंदे, डी.जी.शिंदे, भारत अंबुरे, विष्णु पौळ, अर्जुन काळे, रोहिदास निर्मळ, ऍड.प्रकाश मुंडे आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment