तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

अंबाजोगाईच्या प्रिया कमलाकर कांबळे हिला हाँगकाँग येथील विद्यापीठाची शिष्यवृत्तीमास्टर ऑफ बुद्धीस्ट कौंसिलिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रिया कांबळे हाँगकाँगला रवाना

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-  येथील प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची कनिष्ठ कन्या प्रिया हिला हाँगकाँग येथील बुद्धीस्ट स्टडी सेंटरने शिष्यवृत्ती मंजुर केली आहे.त्यामुळे बौध्द धम्माविषयी समुपदेशन (‘मास्टर ऑफ बुद्धीस्ट कौंसिलिंग') चे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रिया ही नुकतीच हाँगकाँगला रवाना झाली आहे.प्रियाच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


अंबाजोगाई येथील खोलेश्‍वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची कनिष्ठ कन्या तथा भाशिप्र संस्थेच्या सिद्धेश्‍वर महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी प्रिया कमलाकर कांबळे ही उच्च शिक्षणासाठी नुकतीच हाँगकाँगला रवाना झाली आहे. प्रियाचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण हे भाशिप्र संस्थेच्या सिद्धेश्‍वर शैक्षणिक संकुल माजलगाव येथे पुर्ण झाली आहे.लहान वयापासुनच प्रिया ही अभ्यासात हुशार आहे. पुणे विद्यापीठातुन एम.ए.पाली विषयाचे शिक्षण पुर्ण करून 65 टक्के गुण घेवून ती नुकतीच उत्तीर्ण झाली आहे.पाली विषय शिकताना बुध्दिझम मध्ये तीला आवड निर्माण झाली.याच दरम्यान हाँगकाँग येथील भिक्खु धम्मज्योती हे पुणे विद्यापीठात पाली विषय शिकविण्यासाठी व्याख्याते म्हणून नेहमीच येतात त्यांचा व प्रियाचा परिचय झाला. द्वितीय वर्षांत शिक्षण घेत असताना धम्म ज्योती यांनी आवाहन केले की,भारतीय विद्यार्थ्यांनी बुध्दिझम समजून घेण्यासाठी हाँगकाँगला यावे जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती देण्यात येईल.बुद्धिस्ट स्टडी सेंटरच्या वतीने एक वर्षाचा ‘मास्टर ऑफ बुद्धीस्ट कौंसिलिंग' हा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो.हा अभ्यासक्रम शिकण्याची जिज्ञासा प्रियाच्या मनात निर्माण झाली व तीने पुणे विद्यापीठात शिकत असतानाच हाँगकाँग येथे पुढील उच्च शिक्षणासाठी अर्ज दाखल केला.यासाठी तीला डॉ.महेश देवकर यांचे ही मार्गदर्शन लाभले.हाँगकाँगला जाण्यासाठीची माहिती तेथील व्यवस्था,प्रवास ही सर्व काही नविन असताना प्रथमच देशाबाहेर शिक्षणासाठी जाण्याचा धाडसी निर्णय प्रियाने घेतला त्याला तिचे वडील प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे व कुटुंबियांनी तात्काळ अनुमती दिली.प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी ‘जातक कथा' या विषयात आपल्या पीएच.डीचा प्रबंध पुर्ण केला.याचीही प्रेरणा बालवयापासूनच प्रियाला मिळाली व ती नुकतीच हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी हाँगकाँग येथे रवाना झाली आहे. बुद्ध धम्माच्या अभ्यासासाठी हाँगकाँगचे विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना प्राधान्य देते अशी माहिती प्रिया कमलाकर कांबळे हिने दिली आहे. प्रियाच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment