तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

धनंजय मुंडेंनी केली परळीच्या निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापनादुष्काळ आणि मंदीचे सावट दूर करण्याचे विघ्नहर्त्याला साकडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि. 2 --------- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज आपल्या येथील निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली दुष्काळ आणि मंदीचे संकट दूर करण्याचे साकडे त्यांनी श्री गणरायाला घातले.

मुंडे हे दरवर्षी आपल्या परळी वैजनाथ या जन्मगाव च्या घरी श्री ची प्रतिष्ठापना करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी विधीवत पूजा करुन सपत्नीक तिची प्रतिष्ठापना केली यावेळी गणरायाला प्रार्थना करताना
विघनहर्त्याला राज्याची या देशाची भरभराट होऊ दे अशी मनोभावे आराधना केल्याचे त्यांनी सांगितले.

आजही महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. विघनहर्त्याची स्थापना करत असताना बाप्पाला विनम्र प्रार्थना केली की या दुष्काळाचे सावट दूर होऊ दे. गणपती बुद्धीची देवता आहे. आज देशात, राज्यात जे नीच पातळीचे राजकारण सुरू आहे, त्या सत्तापक्षातील नेत्यांना गणपती सद्बुद्धी देवो ही सुद्धा प्रार्थना केली. त्याचप्रमाणे या सरकारने निर्माण केलेल्या महाभयंकर अशा आर्थिक संकटाला आपण तोंड देत आहोत. या सरकारला हे आर्थिक संकट तर दूर करता येणार नाही, विघनहर्त्याने ते दूर करावं ही मनपूर्वक प्रार्थना करून त्यांनी हा उत्सव साजरा करताना दुष्काळाच्या संकटाचे भान ठेवावे असे आवाहन करून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या

गणेशोत्सव गणपती बाप्पा मोरया

No comments:

Post a comment