तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 September 2019

जागतिक क्रिकेटमध्ये श्रीलंकन गोलंदाजांचाच वरचष्मा


आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होऊन १४२ वर्ष झाली आहेत. सुरुवातीला सन १९३२ मध्ये कसोटी, सन १९७१ ला वनडे, सन २००६ - ०७ मध्ये टि- २० क्रिकेटचे अधिकृत सामने सुरू झाले. ७००० पेक्षाही अधिक सामने या कालावधीत खेळले गेलेत. या दरम्यान अनेक रथी महारथी गोलंदाज क्रिकेटच्या या तिनही प्रारूपात आपली ताकद, कसब व मर्यादा अजमावून गेले. परंतु या तिनही प्रकारात क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, गोलंदाजांची तुफानी फौज असलेल्या वेस्ट इंडिज, न्यूझिलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान जागतिक क्रिकेटचे मुख्य आश्रयदाते असलेल्या भारतालाही जागतिक क्रिकेटमधे या तिनही प्रकारात सर्वाधीक बळी घेणारे गोलंदाज पैदा करता आले नाही. आंतराष्ट्रीय क्रिकेटचा अवघ्या ३७ वर्षांचा अनुभव असलेल्या, सन १९८२ मध्ये कसोटीचा टिळा लावणाऱ्या श्रीलंकेच्या गोलंदाजांनी वरील तिनही प्रकारात आजच्या तारखेला सर्वाधीक बळी घेणाऱ्या गोलंदाजात अव्वल स्थान गाठले आहे.एवढेच नाही तर जगातील सर्वात यशस्वी व मोठी लिग स्पर्धा म्हणून गणल्या जाणाऱ्या आयपीएल मध्येही सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही श्रीलंकेचाच आहे.

                 कसोटी, वनडे या दोन प्रकारात श्रीलंकेचा विचित्र शैलीचा ऑफस्पीन गोलंदाज मुथय्या मुरलीधरन सर्वाधीक बळी घेऊन क्रिकेटच्या या दोन्ही प्रकारात जगातील सर्व गोलंदाजांत आघाडीवर आहे.तर त्याचाच देशबांधव व जगावेगळ्या शैलीचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा टि-२० प्रकारात सर्वाधिक बळी घेऊन आजमितीला अव्वल स्थानी आहे.
                 मुथय्या मुरलीधरन श्रीलंकेकडून ३५०            एकदिवशीय सामने खेळला. त्यापैकी ३४१ डावात गोलंदाजी करताना २३.०८ च्या सरासरीने सर्वाधिक ५३४ बळी घेतले. या दरम्यान मुरलीधरनने १० वेळा सामन्यात पाच किंवा अधिक बळी घेण्याची किमया केली. हाही एक विक्रम असून त्याचाही मानकरी श्रीलंकन गोलंदाजच आहे. वनडे मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यात पाकिस्तानचा वासिम अक्रम आहे. त्याने ५०२ बळी घेतले. एक दिवशीय सामन्यात पाचशेच्यावर बळी घेणारे हे दोघेच गोलंदाज आहेत.
              कसोटी क्रिकेटमध्ये ही मुरलीधरनच सर्वाधिक बळी घेणाऱ्यात आघाडीवर आहे. १३३ कसोटींच्या २३० डावात गोलंदाजी करताना २२.७२ च्या सरासरीने मुरलीने जगभरातील ८०० फलंदाजांची बासरी वाजली वाजविली. त्यामध्ये विक्रमी ६७ वेळा डावात ५ किंवा अधिक बळी घेतले. त्याचबरोबर तब्बल २२ वेळा कसोटीत १० किंवा अधिक बळी घेतले.

                तर टि -२o या क्रिकेटच्या शेवटच्या प्रकारात बळीचं शतक गाठणारा एकमेव गोलंदाजही श्रीलंकेचाच आहे. यॉर्कर किंग अशी ख्याती प्राप्त लसिथ मलींगा या कामगिरीचा मानकरी आहे. मलिंगा ७४ टि २० खेळला असून त्यामध्ये  १०१ बळी त्याच्या खात्यावर जमा झाले आहेत. टि-२० प्रकारात १०० बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला.
                जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅट्रीक घेणारा गोलंदाजही श्रीलंकेचाच असून तो मानही लसिथ मलिंगालाच मिळाला आहे. त्याने एक दिवशीय क्रिकेटमध्ये तीन तर टि-२० मध्ये दोन हॅट्रीक घेतल्या. वनडे व टि २० मध्ये सलग ४- ४ गडी बाद करून अनोखी हॅट्रीक करणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे. त्याच्या नावावर एकूण पाच हॅट्रीक आहेत.              

                एक दिवशीय सामन्यात एका डावात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रमही श्रीलंकेच्याच गोलंदाजाच्या नावावर आहे. डिसेंबर २००१ मध्ये सिंहली स्पोर्टस् ग्राऊंडवर झिंबाब्वेविरूध्द श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज चामिंडा वासने १९ धावात ८ फलंदाज बाद करून ऐतिहासीक पराक्रम केला. वनडे सामन्यात आठ बळी घेणारा चामिंडा वास जगातला पहिला व एकमेव गोलंदाज आहे.
               एकेकाळी विंडीजचे जलदगती गोलंदाज जगभरातल्या फलंदाजांना जखमी करत असताना श्रीलंकेच्या रूमेश रत्नायकेने विंडीजच्या लॅरी गोम्सचे दोन दात पाडून विंडीजच्या फलंदाजांनाही इतर देशांच्या फलंदाजांचे दुःख दाखवून दिले. असं करणारा तोही  जगातला पहिलाच गोलंदाज ठरला.

            श्रीलंकेचाच लसिथ मलिंगा जगातल्या सगळ्यात मोठ्या आयपीएल या लिग स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या मलिंगाने १५४ बळी घेतले आहेत.

               लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

मो. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment