तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

टोकवाडी जि.प.प्रा. शाळेत ग्रामस्थांच्या योगदानातून गणवेश, संगणक संच वाटप व साऊंड सिस्टिमचे उद्घाटन !


खर्चिक वाढदिवस न करता शाळेच्या विकासात योगदान द्यावे - डॉ. राजाराम मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
         नेहमीच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत गावातील विद्येचे मंदिर असलेल्या जि प शाळेला सर्व सुविधांनी युक्त बनवून टोकवाडी  ग्रामस्थांनी आदर्श निर्माण केला आहे .टोकवाडी शाळेत गणवेश वाटप, संगणक संच भेट व साऊंड सिस्टिम चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. प्रत्येकाने आपला वाढदिवस खर्चिक स्वरूपात न करता वाढदिवसाला होणारा खर्च शाळेच्या व गावाच्या सार्वजनिक उपक्रमात लावून योगदान द्यावे असे आवाहन या प्रसंगी वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य डॉ.राजाराम मुंडे यांनी केले.
      जि. प. प्रा. शाळा टोकवाडी येथे दि. 29 ऑगस्ट रोजी  विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, दोन संगणक संच उद्घाटन तसेच डॉ. राजाराम मुंडे  यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी दिलेल्या साउंड सिस्टीम संचचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे उपसभापती  बालाजी (पिंटू) मुंडे हे होते. या वेळी गावच्या सरपंच सौ. गोदावरी ताई राजाराम मुंडे, उपसरपंच डॉ. संदीपान काळे, डॉ. राजाराम मुंडे, माजी उपसरपंच तुकाराम काळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यपक दिनकर येवतेकर व्यासपिठावर उपस्थित होते.
    या प्रसंगी बोलताना डॉ. राजाराम मुंडे यांनी उपस्थित सर्वांना शाळेचे महत्त्व सांगून शाळा हे गावच्या विकासाचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे गावातील प्रत्येकाने खर्चिक वाढदिवस न करता आपल्या वाढदिवसा निमित्तचा होणारा खर्च शाळेच्या विकासा साठी देऊन योगदान द्यावे. ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ मिळून शाळेला आणि गावाला आदर्श बनवण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष पं. स. उपसभापती बालाजी मुंडे यांनी शाळेस व गावास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सर्व मान्यवर व ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून शासनाच्या योजनेत गणवेश मिळत नसलेल्या सर्व मुलांना गणवेश देण्याची तरतूद केली.    
        याप्रसंगी टोकवाडी येथील ग्रामस्थ, नेहरू नगर शाळेचे मुख्याध्यापक बोईनवाड,शिक्षक आणि विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाम अघाव यांनी केले. सुत्रसंचलन शिक्षक काचेबोईनवाड मारुती यांनी केले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व विध्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment