तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

जेष्ठ शिवसैनिक व मा.उपशाखा प्रमुख श्री.हनुमंत शिंदे यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमनबाळू राऊत  प्रतिनिधी 
मुंबई : समाजातील विविध जाती धर्मातील एकतेला टिकून ठेवण्यासाठी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. एकतेच्या उद्देशाने सुरु केलेला हा उत्सव बघता बघता देश विदेशाच्या कानाकोपऱ्या तसेच घराघरा पर्यंत जाऊन पोहोचला.श्री गणेशजी हे एकतेचे प्रतिक आहे.
हनुमंत शिंदे हे गेली ३४  वर्षापासून गणेश उत्सव साजरा करतात. या वर्षी ते आपल्या नवीन वास्तू असणारी चिरागनगर अल्फा पार्क मध्ये साजरा करत आहे. 
हा गणेश उत्सव दरवर्षी एक नामवंत व्यक्तिमत्व जेष्ठ शिवसैनिक व मा.उपशाखा प्रमुख श्री.हनुमंत शिंदे यांच्या घरी गणपती बाप्पा येतात आणि ते मोठ्या भक्ती भावाने श्रीची सेवा करतात घरी ते उत्क्रुष्ट अशी रोषणाई करतात.आणि भक्ती भावात तल्लीन होतात.ते पशुपक्ष्यांना खाण्यासाठी देतात तसेच रोज गोमातेला चारा , भटक्या कुत्र्यांना बिस्कीट देतात हा त्यांचा नित्यनियम आहे .पशुपक्षी , आणि प्राणी यांची सेवा हीच खरी सेवा आहे असे ते मानतात .ते नेहमी म्हणतात संत तुकाराम महाराज यांच्या अभंग प्रमाणे "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे" वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. 
त्यांच्या घरगुती गणपतीच्या सत्यनारायण महापुजेचे दर्शन करण्याकरिता शिवसेना शाखा क्र १२९ चे सर्व शिवसैनिकानी तसेच विभागातील लहान थोर मंडळींनी लाभ घेतला

No comments:

Post a Comment