तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

औष्णिक विद्युत केंद्राचे कार्यकारी अभियंता विष्णू हिंगणे सेवानिवृत्तपरळी वैजनाथ ( प्रतिनिधी):- परळी विधुत केंद्र येथे कार्यकारी अभियंता म्हणून 34 वर्षे सेवा केलेले  विष्णु रघुनाथराव हिंगणे   सेवा यशस्वीरित्या पूर्ण करून वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्ताने दि. 31 ऑगस्ट 2019 रोजी महानिर्मिती परळी वैजनाथ  यांच्या वतीने सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी श्री. शिंदे साहेब (मुख्य अभियंता ,औष्णिक विद्यूत केंद्र परळी) व श्री. राऊत साहेब (उपमुख्य अभियंता ,औष्णिक विद्यूत केंद्र परळी) यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेले त्यांचे सहकारी व नातेवाईक यांनी त्यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच त्यांना त्यांचे  भावी जीवन सुखसमृद्धीचे व आरोग्यदायी जावे यासाठी सर्वांच्या वतीने त्यांना  शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment