तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

विनायक मेटेंना पंकजा मुंडेंचा जोर का धक्का,एकमेव जि.प.सदस्य भाजपात दाखलबीड (प्रतिनिधी) :- महाजनादेश यात्रेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटें यांच्यामधील संघर्ष राज्याने उघड्या डोळ्यांनी पाहिला. याचाच वचपा काढायला पंकजा मुंडे यांनी सुरुवात केली असल्याचे आज सिध्द झाले आहे. या अगोदरही शिवसंग्रामच्या तीन जिल्हा परिषद सदस्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला होता. मात्र,आज शेवटचा उरलेल्या एका जिल्हा परिषद सदस्य देखील विनायक मेटेंची साथ सोडत भाजपात डेरेदाखल झाला आहे.

शिवसंग्रामचे एकमेव उरलेले नेकनूर, जिल्हा परिषद गटाचे जि.प.सदस्य भारत काळे यांनी आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहिर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत आ.सुरेश धस, राजेंद्र मस्के हे उपस्थित होते. यावेळी आपण पंकजाताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात जाहिर प्रवेश करत असल्याचे भारत काळे यांनी सांगितले आहे.

यामुळे,विनायक मेटेंना जोरदार धक्का बसला आहे.पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी आपली जादुची कांडी फिरवत मेटेंना मोठा शह दिला आहे.यामुळे,आगामी विधानसभा निवडणुकीत विनायक मेटे यांची वाट बिकट होऊन भावी राजकीय अस्तित्वाची परिस्थिती खडतर निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment