तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 28 September 2019

परळीच्या आर्धाभागातील वीजपुरवठा दिवसभरापासुन गुल ; महावितरणचे अधिकारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर, अधिकार्यांची कमतरतेचा ग्राहकांना फटकापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील विजवितरण कंपनीचा कारभार ढासळला असून शहरात रोहित्र बसविण्याच्या नावाखाली आर्धी परळी शहराच्या वीजपुरवठा दिवसभरापासुन खंडित झाल्याने नागरिकांनी परेशानीचा सामना करावा लागला. महावितरण कार्यालयातील अधिकार्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. 
        शहरातील  कृष्णा नगर, गणेशपार रोड, सावतामाळी नगर, नरहारी मंदिर परिसर, पद्मावती, सिध्देश्वर नगर, संभाजी नगर, बरकतनगर, इंदिरा नगर, जवाहरलाल महाविद्यालयाचा परिसर, राणी लक्ष्मीबाई टावर परिसर ते गणेश परिसर व अन्य परिसर व परळीच्या अर्धाभाग आज दि.२८ सप्टेंबर रोजी  दिवसभर विज गायब होती.  तसेच संपूर्ण शहरात चार थेंब पडले तरी व थोड्या थोड्या कारणावरून विजपुरवठा खंडित होतो. पूर्वी ढगांचा गडगडाट झाल्यावर, विजा चमकल्यानंतर विजपुरवठा खंडित होत असे. पण परळीत ढगांचा गडगडाट व विजा नाही चमकल्या तरी पावसाचे चार थेंब पडताच विजपुरवठा खंडित होतो. यामुळे  गरमीत नागरिकांना रात्र काढावी लागत आहे. यंदा पाऊस न झाल्यामुळे वातावरणातील गर्मी आणखी कमी झाली नाही. हस्त नक्षत्र सुरू असल्याने उष्णतेचा पारा वाढला आहे. दिवसभर आकाशात ढगांची गर्दी असते पाऊस कधीतरी पडतो यामुळे पअगोदरच गर्मी वाढली आहे. यात विजवितरण कंपनी विजपुरवठा खंडीत करून भर टाकत आहे. शहरातील विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी येथील विजवितरण कंपनीच्या ग्राहकांनी केली आहे. 
प     दरम्यान शहरातील नागरिक महावितरण कार्यालयाशी विजपुरवठा व्हावा यासाठी अधिकार्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु अधिकारी यांचा संपर्क झाला नाही. परळीचे अधिकारी फोन उचलत नसल्याने अखेर परळीकरांनी अंबाजोगाई, बीड, लातूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधला. परळीमध्ये जवाबदार महावितरण कार्यालयातील उप अभियंत्यांचे पदे भरण्याची मागणी करीत आहेत.

No comments:

Post a comment