तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 September 2019

अध्यात्म जीवनाची गुरुकिल्ली - ह.भ.प. रामरावजी ढोक महाराजजिंतूर :-  सेलू शहरात नूतन महाविद्यालयाच्या प्रारंगणात आ.विजय भांबळे आयोजित ह.भ.प. रामरावजी ढोक महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून रामायन कथा चालू आहे. या कथा श्रवणास तालुक्यातून रामभक्तांची संख्या उस्फुर्त असून हजारोच्या संख्येने महिला, बाल, व नागरिक उपस्थित राहत आहेत. रामराव ढोक महारज यांच्या सुश्राव्य वाणीतून नागरिक मंत्रमुग्ध होऊन रामायण कथेचे श्रवण करत आहेत.

            अध्यात्म जीवनाची गुरुकिल्ली असून रामायणात जीवनाचे सार आहे. अनेक संकटातून मुक्त होण्याची ताकत रामायणातून मिळते. तर रामायण कथा श्रावणात राम जन्म झाला असून बालराम राम गृहस्थाश्रमापर्यंत पोहचले आहेत. लक्ष्मणाच्या लीला व सीतामाई यांचे दर्शन हा.भ.प. ढोक महाराज यांच्या शैलीतून संगीतमय मैफिलीत श्रावक मंत्रमुग्ध होऊन रामायण श्रवण करत आहेत.

            रामायण कथेसाठी भव्य मंडप उभारला असून पंधरा हजारापेक्षा जास्त भाविक उपस्थित राहत असून लाईट, व एल इ डी ची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या रामायण दिवस अखेर सेलू तालुक्यातील डॉक्टर, वकील, व्यापारी, व अन्य इतर क्षेत्रातील मान्यवर आरती साठी उपस्थित राहत आहेत.

            या कार्यक्रमास नित्यनेमाने माजी मंत्री श्री माणिकराव भांबळे, पूज्यनीय नामदेव महाराज (चारठाणा),खा.सुप्रियाताई सुळे, आ.विजय भांबळे,सौ.उज्वलाताई राठोड, राजेंद्र लहाने, अशोक काकडे, बाळासाहेब रोडगे, रामराव उबाळे डॉ. संजय रोडगे, पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम पावडे, तालुकाध्यक्ष माऊली ताठे, रघुनाथ बागल, अजय डासाळकर, गणेश मुंढे, डोईफोडे, आदी प्रमुख कार्यकर्ते व सेलू तालुक्यातील सरपंच, सर्व पदाधिकारी येथील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment