तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 September 2019

मराठवाडा मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या राजाला अखेरचा निरोपबाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई :' गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या' मोरया रे बप्पा मोरया रे घाटकोपर मधील पारशीवाडी येथे मराठवाडा मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळकडून गणरायाला अखेरचा निरोप देण्यासाठी बहूसंख्य कार्यकर्ते सामील होऊन लेझीम व डोलताश्याच्या गजरात बाप्पाना अखेरचा निरोप देण्याकरिता मार्गस्थ झाले.विसर्जनाकडे जात असताना जागोजागी विविध ठिकाणी स्वागत होत गेले अखेर शीतल तलाव या ठिकाणी आरती करून मराठवाड्याच्या राजाला अखेरचा निरोप दिला .' गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या' मोरया रे बप्पा मोरया रे या गजराने आजूबाजूचा परिसर धूमधूमून निघाला 
मराठवाडा मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे दरवर्षी गणेश उत्सव साजरा केला जातो .ह्या वर्षी मंडळाचे ३२ वे वर्ष आहे.या गणेशउत्सावाची स्थापना १९८७ साली या मंडळाची स्थापना संस्थापक अध्यक्ष १२९ चे शिवसेना शाखा प्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी यांनी केली.
मराठवाडा मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे या वर्षी सुबक अशी मूर्ती बसवली आहे .मूर्ती बघताच भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटते तसेच विविध कलरची विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.मंडळाच्या वतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रोज सकाळी ७ ते ११ या वेळेत श्री मंडपात होते.तसेच मंडळाकडून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व मोतीबिंदू तपासणी व गरजू लोकांना मोफत चष्मा वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. .त्यामध्ये उत्स्फूर्त नागरीकांनी सहभाग नोंदवला .घरगुती गौरी सजावट स्पर्धा , आराधी मंडळ आईचा जागर , लहान मुलांसाठी इंग्लीश स्पेलिंग कॉम्पिटिशन , महिलांसाठी हळदी कुंकू स्पर्धा , सांस्क्रुतिक पारंपरिक कार्यक्रम , तसेच भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाचा भक्तीमय भजनाचा कार्यक्रम झाला दरवर्षी महाराष्ट्र युवा सेवा संघ मंडळाकडून  शिवजयंती देखील साजरी केली जाते .महाराष्ट्र युवा सेवा संघ मंडळाचे अध्यक्ष  सुहास कोल्हे पाटील दरवर्षी हटके शिवजयंती साजरी करतात .महाराष्ट्राचे पारंपरिक डोल व लेझीमच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन नाचते .मराठवाडा मित्र मंडळाचे लेझीम पथक देखील आहे आणि हे पथकाचे उत्तम नियोजन लक्ष्मण घोडके पार पाडतात .
मंडळास  महत्वाचे असे योगदान देणारे कार्यकर्ते देखील मोठ्या तन्मयता पूर्वक भक्ती रसात तल्लीन होतात शिवसेना शाखा प्रमुख शिवाजी मामा कदम , शिवाजी लिमसे , शिवाजी गायकवाड , रमेश अनभूले , सुहास कोल्हे , गोकुळ धुमाळ , संभाजी पवार , बाळासाहेब टेकवले , पोपट कोकाटे , संतोष गायकवाड , रामदास जगताप , लक्ष्मण घोडके , रामहरी चव्हाण , ज्ञानेश्वर खिळे , महादेव मोटे , बाळू चव्हाण , सतीश कोकाटे , सायजी घोडके  राजू घोडके, दिपक गायकवाड , आनंद नांदे , नितीन गुळवे , विठल खामकर , विजय सिंग , भावेश पटेल , कांतिलाल जाधव , संतोष बोराडे , संतोष तेलप , विकास कोल्हे , सचिन अरेकर , सुभाष इचके , अंकुश मुंडे , गौतम कांबळे , सतीश भालेराव  , सुनील जाधव सचिन सातपुते , रवि सातपुते

No comments:

Post a Comment