तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

धनंजय मुंडेंच्या फंडातुन परळीत चर्मकार बांधवांसाठी संत रोहिदास सामाजिक सभागृहाची उभारणी

सौ.राजश्रीताई मुंडेंच्या हस्ते झाला कामाचा शुभारंभ

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.07........विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यंाच्या स्थानिक विकास निधीतुन परळी शहरातील चर्मकार बांधवांसाठी संत रोहिदास सामाजिक सभागृहाची उभारणी करण्यात येणार असून, सौ.राजश्रीताई मुंडे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला.

शहरातील किर्तीनगर भागात हे सामाजिक सभागृह (मंदिर) बांधले जाणार आहे. शहरात मोठ्या संख्येने असलेल्या चर्मकार बांधवांची सामाजिक सभागृहाची मागणी होती, समाजाच्या या इच्छेबाबत माहिती होताच धनंजय मुंडे यांनी स्वतः पुढाकार घेत संत रोहिदास सामाजिक सभागृह उभारण्याचे आश्‍वासन देवुन स्वतःच्या स्थानिक विकास निधीतुन यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्याचा शुभारंभ काल शुक्रवार दि.06 सप्टेंबर रोजी सौ.राजश्रीताई मुंडे यांच्या हस्ते झाला.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, प्रा.विनोद जगतकर, नगरसेवक राजाखान गुत्तेदार, श्रीकृष्ण कराड, गोपाळराव आंधळे, रईसभाई व चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गौरी पुजनाच्या दिवशी वहिनींच्या रूपात लक्ष्मी आली

गौरी पुजनाच्या दिवशी सौ.राजश्री वहिणींच्या रूपात साक्षात लक्ष्मी येवुन संत रोहिदास महाराज सभागृहाचा प्रत्यक्ष प्रारंभ झाल्याने व वचनपुर्ती झाल्याने चर्मकार समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक विकास निधी शिवाय या मंदिराच्या उभारणीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन यावेळी सौ.राजश्री वहिणींनी दिले व काम करणार्‍या व्यक्तीच्या पाठीशी आशिर्वाद देण्याचे आवाहन केले. 

सर्व समाजासाठी सामाजिक सभागृह

शहरातील सामाजिक समतोल राखत ना.धनंजय मुंडे यांनी आज पर्यंत गायत्री भवन, संत गाडगेबाबा सभागृह, संत नामदेव महाराज सभागृह, भगवान महावीर भवन, विश्‍वकर्मा भवन, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर सभागृह, स्व.मनोहर पंत बडवे सभागृह, भोई समाज सभागृह, भिमवाडी येथील बुध्द विहार, लुंबिनीनगर येथे बौध्द विहार, पंचशिलनगर येथे बौध्द विहार, मुस्लिम समाज शादीखाना, बागवान सभागृह, संत वाल्मिकी सभागृह अशा सामाजिक सभागृहांची उभारणी केली आहे. लवकरच संत तुकाराम महाराज-शिवाजी महाराज शिवसृष्टी, संत सेवालाल भवन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, संत गोरोबा काका सभागृह आदींची उभारणी करण्यात येणार आहे.

No comments:

Post a comment