तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

परळी शहरातील आजी-माजी सैनिकांची घरपट्टी होणार माफधनंजय मुंडेंच्या सुचनेनंतर नगर पालिकेचा निर्णय

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.04...... देशाच्या संरक्षणासाठी योगदान देणार्‍या आजी-माजी सैनिकांची घरपट्टी (मालमत्ता कर) रद्द करण्याचा अतिशय महत्वपुर्ण निर्णय परळी वैजनाथ परिषदेने विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सुचनेनंतर घेतला आहे.

परळी शहरातील माजी सैनिकांच्या एका शिष्टमंडळाने या संदर्भात ना.धनंजय मुंडे यांची भेट घेवुन मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत ना.मुंडे यांनी तातडीने परळी नगर पालिकेला या संदर्भातील ठराव घेण्याची सुचना केली. त्यानुसार माजी सैनिक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज परळी नगर पालिकेत पदाधिकार्‍यांची भेट घेवुन या संबंधीचे निवेदन दिली. त्यावर तातडीने कार्यवाही करत संघटनेची मागणी आणि ना.मुंडे यांची सुचना लक्षात घेवुन पालिकेने या संबंधीचा निर्णय घेतला, त्यामुळे या पुढे परळी शहराच्या हद्दीत येणार्‍या आजी-माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विधवा पत्नींना कोणत्याही प्रकारची घरपट्टी लागु होणार नाही. दि.01 ऑगस्ट, 2019 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, संबंधित सैनिकांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी आजी-माजी सैनिक असल्याचा योग्य पुरावा पालिकेत सादर करून आपल्याकडील कर रद्द करून घ्यावा अशी पालिकेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.

या संबंधी आज सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि नगराध्यक्षा सरोजनिताई हालगे, गटनेते वाल्मिक अण्णा कराड, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, नगरसेवक शरीफ भाई, पं.स. उपसभापती बालाजी मुंडे, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. सैनिकांच्या शिष्टमंडळात सुधीर अवचट, नागनाथ गिरी, यादव निवृत्ती, रंगनाथ गित्ते, बाळसकर अंकल, हनुमंत कांबळे,  बाबुराव अघाव, भिमराव गायकवाड, व्यंकट शिंदे, पठाण कासिमखान, नागनाथ वाघमारे, सुनिल वडमारे आदी उपस्थित होते.

दरम्यान सैनिकांबद्दल घेतलेल्या या निर्णयाचे सैनिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी स्वागत करून धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत. सैनिकांचे देशाप्रतीचे योगदान पाहता पालिकेने केलेली ही मदत अतिशय तुटपुंजी असून, दैनंदिन जीवनात त्यांना येणार्‍या प्रत्येक अडी-अडचणीच्या काळात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु असे धनंजय मुंडे म्हणाले.

No comments:

Post a Comment