तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

सरकारी दवाखान्यासह खाजगी दवाखाने हाऊसफुल्लमंगरुळपीर शहरासह ग्रामीण भागात व्हायरल फीवरने नागरिक त्रस्त

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

मंगरुळपीर :- सध्या शहरासह ग्रामीण भागातील जनताही व्हायरल फिवरने ञस्त असुन ग्रामीण रुग्नालयासह खाजगी दवाखानेही हाऊसफुल्ल झालेले दिसत आहेत.नागरीकांनी आरोग्याची काळजी घेवुन तब्येत बिघडल्यास तात्काळ दवाखान्यात जावे असे डाॅक्टरांचे आवाहन आहे.
             मागील काही दिवसांपासुन वातावरणातील बदलांमुळे व्हायरल फिव्हरचा ग्रामीण भागांवर परिणाम जाणवत असुन यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत शासकीय दवाखाने व खासगी रुग्णालयात सर्दी खोकला डोके दुखणे हात पाय दुखणे व ताप असलेले रुग्ण आदी विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी रुग्णालयामध्ये गर्दी दिसत आहे. सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कधी पाऊस येणे कधी मंद वातावरण होणे तर कधी खुप जोरदार पाऊस येणे तर मधात कधी उष्णता असणे या प्रकारामुळे वातावरणात मागील काही दिवसांपासुन बदल होत आहे त्याचा परिणाम ग्रामीण परिसरातील नागरिकांवर होतांना दिसुन येत आहे .ग्रामीण भागातील सरकारी दवाखान्यातील अवस्था अस्ताव्यस्त असल्याने कुठे डॉक्टर आहे तर कुठे डॉक्टरांच्या गैरहजेरीने नागरिकांमध्ये संताप आहे. पाठदुखी ताप येणे सर्दी खोकला आदी आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण ग्रामीण भागातही दिसुन येत आहे.लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने या प्रकाराला लहान मुले बळी पडतात अशावेळी संपर्कात येणाऱ्यांना साथीचे आजार बळावु शकते अशावेळी प्रतिजैविक औषधे घेऊन चालत नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे जाणकार सांगतात.सध्याच्या परिस्थीतीमध्ये मंगरुळपीर ग्रामीण रुग्नालयात दररोज ओपीडी(बाह्यरुग्न विभाग) मध्ये जवळपास पाचशे ते सहाशे रुग्न तपासल्या जात असुन आयपिडीमध्ये (आंतररुग्न विभाग)दररोज सत्त ते ऐंशी रुग्नांची तपासणी करुन ऊपचार केले जात असल्याची रुग्नालयाने माहीती दिली आहे. ग्रामीण भागातील दवाखान्यामध्ये डाॅक्टर,नर्स आदी कर्मचार्‍यांनी रुग्नांना तत्परतेने रुग्नसेवा देणे गरजेचे असुन आवश्यक औषधसाठाही ऊपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.बहुतांश खेडेभागातील सरकारी दवाखान्यात असुविधा जानवत असल्याने प्रसंगी रुग्नांचे हाल होतात.वरिष्ठांनी ग्रामिण रुग्नालयासह प्राथमीक आरोग्य केंद्रावर भेटी देवुन सुविधेची माहीती घ्यावी जेणेकरुन रुग्नांना दर्जेदार सुविधा मिळेल अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेमधुन होत आहे.


आरोग्यविभागाने ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचार्‍यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे जेणेकरुन रुग्नांना आरोग्य सुविधा मिळतील व आवश्यक औषध पुरवठा करुन दर्जेदार आरोग्यसेवा पुरवावी.
          फुलचंद भगत
सामाजीक कार्यकर्ते,मंगरुळपीर


नागरीकांनी रोज शुध्द पाणी प्यावे,स्वच्छ हात धुवावे तसेच कपडेही स्वच्छ धुवुनच घालावे.मंगरुळपीर रुग्नालयात रुग्नासाठी सर्व सुविधा असुन आवश्यक औषधसाठाही ऊपलब्ध आहे.वातावरण बदलाने रुग्नसंख्येत वाढ झाली असुन तात्काळ दवाखान्यामध्ये ऊपचार घ्यावा.
            डाॅ.एल.एन.चव्हाण
वैद्यकीय अधिक्षक,ग्रामीण रुग्नालय मंगरुळपीर

No comments:

Post a Comment