तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

ना. पंकजाताई मुंडे यांच्या राॅयलस्टोन निवासस्थानी गणरायाचे थाटात आगमन




' श्रीं ' ची उत्साहात झाली प्रतिष्ठापना

मुंबई (प्रतिनिधी) :- दि. ०२ ---- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या राॅयलस्टोन या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आज मोठ्या थाटात आगमन झाले. ना. पंकजाताई मुंडे व कुटूंबियांनी श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना केली. 

  ना. पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी  दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीची प्रतिष्ठापना केली जाते. स्वतः पंकजाताई मुंडे या उत्सवाची सर्व तयारी करतात. गणपतीची मुर्ती आणण्यापासून ते त्याची स्थापना करण्यापर्यंत त्या स्वतः बारकाईने लक्ष घालतात, यावर्षी त्यांनी गणपतीची आरास अतिशय आकर्षक व सर्वांचे लक्ष वेधून घेणारी केली आहे. सकाळी विधीवत पूजनाने ना. पंकजाताई मुंडे व डाॅ. अमित पालवे यांनी श्रीची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई, गौरव खाडे, अॅड. यशःश्री मुंडे, आर्यमान पालवे, प्रभाकरराव पालवे आदी कुटूंबिय उपस्थित होते. 

   आजच्या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे विघ्न दूर करण्यासाठी राज्य शासनाला बळ मिळो, पिक पाण्याने बळीराजा सुखी समाधानी होवो तसेच जाती पातीच्या भिंती झुगारून राज्यातील  जनतेला भरभरून विकास मिळावा, यासाठी आम्हाला शक्ती द्यावी अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment