तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 September 2019

जिल्हास्तरावर हाँलीबाँल स्पर्धा मध्ये सोमेश्वर विद्यालय आरखेड चा संघ प्रथम


अरुणा शर्मा
----------------

पालम :- तालुक्यातील सोमेश्वर माध्यमिक विद्यालय आरखेड चा हाँलिबाल संघ जिल्हा स्तरावर सतत तीन वर्षे पासून प्रथम येत असुन याही वर्षी परंपरा कायम राखली. दिनांक 23 सप्टेंबर रोजी जिल्हा स्तरीय सामने जिल्हा संकुल परभणी येथे  झाले. त्यात 17 वर्षी खालील गटात मुले व मुली या गटातून प्रथम  सोमेश्वर माध्यमिक विद्यालय आरखेड चा प्रथम नंबर आला. या संघाची निवड विभागीय स्तरावर नुकतीच झाली. ही निवड सतत तीन वर्षांपासून होत आसून गत वर्षी राज्यस्तरीय हाँलीबाँल स्पर्धा मध्ये भाग घेतला होता. जिल्हा पातळी साखळी सामने खेळले. जिल्यावर मात करून आपला विभागीय पातळीवर विजयी परंपरा कायम ठेवली. मुला मुलीच्या दोन्ही संघाची निवड विभागीय स्तरावर झाली आहे. याचे मार्गदर्शन  क्रीडाशिक्षक सय्यद सिकंदर सय्यद खलंदर हे आहेत  त्याबद्दल शाळेचे संस्थापक राज्य खजिनदार शे.का.प. भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, भाई तुषार गोळेगावकर, संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब पवार, संस्थेचे सचिव डॉ. सं.गो. येलमोटे, सकाराम दुधाटे, शिवाजी दुधाटे, आरखेड नगरीचे सरपंच मारोतराव दुधाटे, मुख्याध्यापक मोतीराम सिरस्कर, प्राचार्य आर.के.क्षीरसागर, संयोजक मोतीराम शिंदे, गजानन पवार, विजय दूधाटे, डीगाबंर दूधाटे, संभाजी कानगुले, मधूकर येवले व शाळेतील  सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी शिक्षकाचे क्रीडा शिक्षकाचे व सर्व खेळाडूच सर्वत्र कडुन अभिनंदन होत आहे.════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'अरुणा शर्मा' पालम, परभणी
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 8975303555  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment