तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

परळी फेस्टिवलची श्री गणरायाची आरती हनुमंत गुट्टे यांच्या हस्ते संपन्न




परळी परिसरातील दुष्काळाचे सावट दूर व्हावे ; हनुमंत गुट्टे यांचे गणरायाला साकडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस, परळी फेस्टिवलचे  संस्थापक प्रा.टी. पी.मुंडे(सर) यांच्या मार्गादर्शनाखाली होत असलेल्या परळी फेस्टिव्हलची सकाळची श्री.गणरायाची मनोभावे पुजा व आरती परळी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस हनुमंत गुट्टे यांच्या हस्ते गणरायाची मनोभावी पुजा करून करण्यात आली. यावेळी परळी फेस्टिवलचे सर्व पदाधिकारी व गणेश भक्त उपस्थित होते. 
       परळी शहरात गेल्या 22 वर्षांपासून अविरत चालू असलेला परळी फेस्टिवलच्या श्री गणरायाची प्रतिष्ठापना 2 सप्टेंबर रोजी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा परळी फेस्टिवलचे  संस्थापक  मुख्य मार्गदर्शक  प्रा  टी पी मुंडे सर यांच्या हस्ते  करण्यात आली. या फेस्टिव्हलचे अध्यक्ष प्रा.विजय मुंडे व जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदिप मुंडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.  आज दि.०५ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशोत्सवातील परळी फेस्टिवलचे श्री.गणरायाची आरती हनुमंत गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच परळी फेस्टिवल मध्ये अनेक सांस्कृतिक मनोरंजनात्मक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे परळीकरांना नऊ दिवस मनोरंजनाची मेजवानी मिळत होती. परंतु यावर्षी दुष्काळाची भयानक दाहकता लक्षात घेता परळी फेस्टिवल मधील सर्व सांस्कृतिक मनोरंजनात्मक प्रबोधनात्मक कार्यक्रम यावर्षी रद्द करण्याचा निर्णय परळी फेस्टिवलच्या सर्व पदाधिकार्‍यांनी घेतला आहे मात्र दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री गणरायाची मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवत पद्धतीने पूजा करून करण्यात आली. यावेळी हनुमंत गुट्टे यांनी पाऊस पडू दे, शेतकरी राजाला सुखी ठेव, सर्वांना सुखी समाधानी ठेव, दुष्काळाचे सावट दूर कर, परळी परिसरातील दुष्काळ व भिषण पाणी टंचाईचे संकट दुर करून तालुक्यातील 
शेतकरी बांधवांना चारा आणि पाणी यांच्या टंचाईपासून मुक्त होवू दे व बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखी समाधानाचे दिवस येवु दे अशी प्रार्थना श्री गणरायाकडे भक्तीभावे केली आहे. यावेळी प्राचार्य  डॉ.बी.डी.मुंडे, नाना मुंडे सर, ढवळे सर, जगताप सर, कृष्णा गुट्टे, आत्माराम गुट्टे, कुलकर्णी देवा, कांबळे मामा, आदी मान्यवर व परळी फेस्टिव्हलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment