तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

क्रीडा दिनाचे औचीत्य .....
भोपळे विद्यालयात पुरग्रस्तांच्या मदतीसाठी खेळाडू विद्यार्थ्यांचा पुढाकार

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले विद्यार्थी खेळाडू

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी खेळा मदतीसाठी उपक्रम

भोपळे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन खेळा मदतीसाठी या उपक्रमाने साजरा

 विशाल नांदोकार 

हिवरखेड : येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंनी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंतीदिनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी खेळा मदतीसाठी हा उपक्रम राबवून मदत निधीचे संकलन केले. या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे हे होते. तर प्रमुख उपस्थितीत पर्यवेक्षक राजेंद्र तायडे, जेष्ठ शिक्षिका कु.आर.एन. अंजनकर, कु.आर.एम. वालोकार, योग शिक्षिका सौ.वर्षा भोपळे हे होत्या. या दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे होते. यात क्रीडा व युवा संचालनालय  व जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांच्यावतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय व विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या तसेच तालुकास्तरीय  मॅरेथॉन स्पर्धेत अव्वल ठरलेले ओम उगले व प्रतीक झगडे या खेळाडूचे कौतुक  दादासाहेब भोपळे व उपस्थितांनी केले. तसेच अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून खेळा मदतीसाठी हे घोषवाक्य वापरून विविध खेळात विद्यार्थ्यांनी सहभाग शुल्क भरून खेळात सहभाग नोंदविला. या खेळाडू विद्यार्थ्यांनी  सामाजिक बांधीलकी जपत पूरग्रस्तांसाठी या सहभाग शुल्काच्या माध्यमातून मदत निधीचे संकलन केले. हा संकलित केलेला निधी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये पाठविला जाणार आहे, अशी माहिती क्रीडा शिक्षक प्रा.संतोषकुमार राऊत यांनी दिली. या उपक्रमाची प्रशंसा करीत दादासाहेब भोपळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना संकटकाळी प्रत्येकाने एकमेकांना मदतीचा हात दिला पाहिजे असल्याचे आवाहन करीत या मदतीसाठी पुढाकार घेतलेल्या विद्यार्थ्यांचे  विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रमोद जानोतकर यांच्या मार्गदर्शनात रंजीत राठोड, प्रशांत भोपळे , अभिजित भोपळे , प्रा.निलेश गिऱ्हे, नितीन निमकर्डे, श्रीकांत परनाटे , आदींनी  सहकार्य केले.

No comments:

Post a comment