तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

मुलांच्या कला कौशल्यांना वाव देणारा प्रवरा सांस्कृतिक महोत्सवचे उद्घाटनसात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे 
    प्रवरा सामाजिक प्रबोधन  व क्रीडा महोत्सव २०१९ अंतर्गत  विविध गुणदर्शन कार्यक्रम उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक ३ रोजी माननीय नामदार सौ.शालिनीताई विखे पाटील अध्यक्ष, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या उपस्थितीत सात्रळ येथे संपन्न झाला. सदर प्रवरा सामाजिक प्रबोधन  व क्रीडा महोत्सव तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रम हा ग्रामीण भागातील मुलांना त्यांचे कौशल्य व कलागुण पुढे आणण्यासाठी वाव देणारा ठरेल, तसेच स्थानिक नागरिकांना आपल्याच मुलाच्या सादरीकरनातून मनोरंजन मिळावे आणि खेड्यातील मूला मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व मा.खासदार डॉ.सुजय विखे पा. लोकसभा सदस्य ,अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला आहे.तसेच 
    सदर कार्यक्रम दिनांक ०३ ते १२ या कालावधीत सुरू राहणार असून त्यामध्ये ०३ तारखेला विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. सदर प्रसंगी दि. ४ रोजी  ह.भ.प. रामकृष्ण महाराज शिंदे व ह.भ.प. गंगाराम महाराज थोरे, वैजापूर  यांचा संगीत व विनोदी असा भारुडाचा कार्यक्रम, दि ५ रोजी ह.भ.प. शितलताई साबळे रामपूर यांचे जाहीर किर्तन ,दि.. ६  रोजी विविध गुणदर्शन कार्यक्रम  आणि दि १० रोजी वाणीभुषण ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील ठाणे  यांचे जाहीर हरी कीर्तन असे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. यामध्ये सात्रळ, सोनगाव, माळेवाडी, डुक्रेवाडी, दिघे वस्ती ,चाणेगाव , झरेकाठी, कानडगाव, तांभेरे, गुहा, सात्रळ आदी मधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, कॉलेज विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहेत. सदर प्रसंगी मा. सौ.शालिनीताई विखे पा. यांच्या हस्ते  अतिशय उत्कृष्ट अशा सादरीकरण झालेल्या व संदेश कार्यक्रमाच्या मुला मुलींना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

सदर प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे  अध्यक्ष, सर्व सदस्य परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पंचक्रोशीतील युवक सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी  आदीनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. 
    या धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा महोत्सवाचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर व  उपप्राचार्य दीपक घोलप यांनी केले.

No comments:

Post a Comment