तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 September 2019

मालेवाडी तांडा येथील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेशपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.26.......परळी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असून, तालुक्यातील मालेवाडी तांडा क्र.2 येथील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
जगमित्र संपर्क कार्यालयात झालेल्या या प्रवेशाच्या कार्यक्रमात लक्ष्मण पवार, भगवान चव्हाण, वैजनाथ राठोड, राम पवार कृष्णा पवार अनिल राठोड संजय पवार काशिनाथ पवार कृष्णा राठोड राम राठोड संजय राठोड गजानन राठोड राजेश राठोड आश्रुबा राठोड पप्पू राठोड बाळासाहेब राठोड बाळासाहेब पवार अर्जुन पवार अमोल राठोड अर्जुन राठोड किरण राठोड अनिल राठोड सुनिल राठोड धर्मराज चव्हाण लक्ष्मण राठोड देविदास पवार आदींनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांनी त्यांना पक्षाचा गमछा देवून स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक नितीन कुलकर्णी हे उपस्थित होते.

No comments:

Post a comment