तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

अफवांवर विश्वास ठेवू नका मी कुठेही जाणार नाही-सुरेशकुमार जेथलिया

परतूर(प्रतिनिधी) परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघात सोशल मिडीयावर जाणून बुजून एका दैनिकाची बातमी पसरवून जनतेची व कार्यकर्त्याची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. सध्या राजकारणात पक्षांतर करण्याची जणू काही स्पर्धा लागली आहे की काय? असे दिसुन येत आहे.

याचा फायदा घेत विरोधी पक्षातील कार्यकर्त्यानी सोशल मिडीयावर एका दैनिकात प्रसिध्द झालेली बातमी सोशल मिडीयावर व्हायरल करून त्यात माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया शिवसेनेच्या वाटेवर या अश्याची असलेली पोस्ट व्हायरल केली असल्याने श्री जेथलिया यांनी न्यायालया मार्फत रीतसर नोटीस बजावली असल्याचे ही युवा नेते नितीन जेथलिया यांनी सांगितले 
 त्यानंतर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जेथलिया यांनी सांगितले की मी कोणत्याही पक्षात जाणार नाही अश्या फालतुच्या अफवांवर कार्यकर्त्यांनी व मतदारांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन केले
कांग्रेस कमिटीच्या वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली काम करत असुन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने संधी दिल्यास पक्षातूनच निवडणूक लढविणार आहे. असे सांगुन विरोधकांच्या पायाखालील वाळू घसरली असुन ते काहीही अपप्रचार करत आहेत असे  सांगितले.

No comments:

Post a Comment