तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

भारतीय किसान संघासोबत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची चर्चा


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई, : शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी व त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मंगळवारी मंत्रालयात भारतीय किसान संघासोबत बैठक घेतली.
यावेळी एचटीबीटी कपासी बियाणे बेकायदेशीर विक्री, पिकविमा अंमलबजावणी व भरपाई, कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणाचा दर्जा सुधारणे, कृषी महाविद्यालयाचे आयसीएआर नुसार मूल्यांकन करणे, शेतमालाचे विपणन, ग्राम गोदाम योजना राबविणे, दुष्काळ आढावा, पूरग्रस्त भागात पुन्हा लागवड व रब्बी पीक अनुदान योजना, ठिबक सिंचन अनुदान 90 टक्के वाढविणे, बियाणे पुरवठा धोरण व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीस आयुक्त सुहास दिवसे, सहसंचालक गणेश पाटील, उपसचिव किरण पाटील, किसान समन्वयक दादा लाड, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष बळीराम सोळंकी, विदर्भ प्रांत महामंत्री बाबुराव देशमुख, प्रांत मंत्री किशोर ब्राम्हनाथकर, प्रांताध्यक्ष राहुल शिंदे, प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील, रमेश मंडाळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment