तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

वंचितांची एकी सत्तेचे समीकरण बदलणार -जीवन राठोड बीड (प्रतिनिधी) :- वंचित बहुजन आघाडी च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा व मुलाखाती दरम्यान जिल्हाध्यक्ष जीवन राठोड यांनी महाराष्ट्रातील ओबीसी भटके-विमुक्त बलुतेदार यांची मोट बांधून एकी निर्माण केल्यास निश्चितपणे येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडी चा असेल यामुळे बीड सह महाराष्ट्रात  सत्तांतर नक्कीच होणार असेच विचार अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
 या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी चे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते गेवराई येथील शासकीय विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ग्रामीण व शहरी भागातून आलेल्या तालुका स्तरीय पदाधिकारी मुलाखतीच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्याचबरोबर विधानसभेची निवडणूक कशा पद्धतीने लढवायची याच्या वर सविस्तर चर्चा झाली गेवराई येथील शासकीय विश्रामगृहावर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाल्यानंतर मुलाखतीला सुरुवात झाली उत्स्फूर्त असा प्रतिसाद गेवराईतील तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते  कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे ओबीसीचे नेते प्रा विष्णू जाधव तर नवनियुक्त जिल्हाध्यक्ष जीवन राठोड महासचिव संतोष मोराळे डॉ नितीन सोनवणे अनिल डोंगरे आनंद सरवदे खंडू जाधव  एस एस सोनवणे इनकर बबन वाडमारे ॲड बक्शुभाई भागवत वैद्य विष्णू देवकते बालाजी जगतकर ज्ञानेश्वर हवाले गणेश खेरमोडे अजय सरवदे लखन जोगदंड सुमित उजगरे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते गेवराईतील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ वंचित वंचित आघाडीचे पप्पू गायकवाड बंटी सौंदरमल किशोर भोले सुभान भाई प्रदीप तुरुकमारे कैलास भोले भारिप वंचित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a comment