तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

तिर्रटच्या जुगारी बादशहावर खाकीचे तीन एक्के पडले भारी15 जुगारीनां अटक व नऊ लाख एक्यानवु हजार दोनशे रूपयांचा मुद्देमाल जप्त

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरापासुन जवळ व  ग्रामिण हद्दीत येणाऱ्या एका कलाकेंद्राच्या पाठीमागे एका शेडमध्ये तिर्रट नांवाचा जुगार अड्यावर पोलीसांनी धाड टाकुन जुगार खेळणाऱ्या पंधरा जुगाऱ्यांना अटक केली असुन केली असुन पाच मोटार सायकल एक स्विफ्ट कार जुगार खेळण्याचे साहित्य व नगदी असा 9.91.200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन 15 जुगाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
परळी तालुक्यातील परळी, बीड, तेलगाव रोडवरील टोकवाडी गावाजवळील कलाकेंद्राच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये  पैसे लावुन तिर्रट नांवाचा जुगार चालु आहे अशी गुप्त माहिती SDPO राहुल धस यांना मिळाली असता त्यांनी परळी शहरचे पो.उ.नि.चाँद मेंडके व पो.हे.काँ.बांगर, पो.ना.केंद्रे व पो.काँ.हरगावर यांना सोबत घेवुन सदर ठिकाणी धाड टाकली असता तेथे पंधरा जुगारी तिर्रट खेळतांना आढळुन आले तसेच MH 44R 0195, MH 01CK  7107,MH44 L8992, MH 44P7686 या चार मोटारसायकल व एक स्विफ्ट कार क्र.MH23 TR 232 आढळल्या पोलीसांनी या मोटार सायकली, कार ,जुगाराचे साहित्य व नगदी नवु लाख एक्यानव हजार दोनशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशनला आनुन जमा केला व जुगार खेळणाऱ्या किशन हरिभाऊ तांदळे, हनमंत वाल्मिक गित्ते, रंगनाथ दगडुबा शिंदे, भानुदास माणिक मुंडे, राजेश हरिशचंद्र घायाळ, गोविंद गोपीनाथ मुंडे, कडाजी श्रीरंग कडभाने,नवनाथ तुकाराम कदम , राजराम माणिक लांडगे, अविनाश नारायण लगसकर, मदन भगवान कराड, श्रीकृष्ण कोंडीबा बोडले, जगदिश गोविंद मुंडे व रोहित सुनिल पुजारी अश्या 15 जणावर 4,5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक
अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.  परळी तालुक्यात अनेक वर्षानंतर जुगार अड्यावर झालेली हि मोठी कारवाई असुन सदर कारवाई पोलीस अधिक्षक हर्ष पोददार व अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली  SDPO राहुल धस यांनी पो.उप.नि.चाँद मेंडके व त्यांची टिम बरोबर घेवुन केली.या कारवाईचे नागरिकातुन पोलीसांचे कौतुक होत आहे तर जुगार अड्डे चालकांचे धाबे दणाणले आहे.

परळीतील गुटखा प्रकरण.
72 तास उलटले गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल नाही. अन्न व औषध प्रशासनाचा भोगंळ कारभार. महाराष्ट्र शासनाने राज्यात शरीराला हानिकारक व आरोग्यास धोका उत्पन्न करणारा गोवा,गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ विकण्यास,बाळगण्यास बंदी घातली असुन यावर नियत्रंण ठेवणे त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करणे हे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत व राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी यांचे कार्यालय  ठेवले आहे मात्र गुटखा बंदी अमलात आल्यापासुन या विभागाने स्वताहुन किती गोवा,गुटखा पकडला,किती जंणाना शिक्षा झाली याची दहा मार्काची प्रश्न पत्रिका काढुन तीचे उत्तर पहिलीच्या विद्यार्थाला द्यायला सांगीतले तर या विभागाला दहा पैकी शुन्य मार्क मिळतील एवढी यांच्या कामगीरीचा निचांक दिसुन येत आहे.पोलीस विभागाने डोळ्यात तेल घालुन कायदा,सुव्यवस्था साभांळत गोवा,गुटखा पकडायचा व अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यास वेळखाऊ पणा करायचा हे नित्याचेच झाले आहे .
सर्व सामान्य नागरिक आपल्या रक्ताचे पाणी करून कष्टाने कमावलेल्या पैशावर सरकारला भरलेल्या करातुन या अन्न व औषध विभागाच्या पांढऱ्या हत्तीनां पगार मिळतो मग कामच करायचे नाही तर हे लंगडे पांढरे हत्ती काय कामाचे असा सवाल जनतेतुन विचारला जात आहे तर हि जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाकडुन काढुन घेवुन शासनाने ती दारू बंदी उत्पादन शुल्क विभागाकडे सोपवावी अशी चर्चा होत असुन आता पर्यंतच्या गोवा,गुटख्याच्या केसेस मध्ये चालढकल करने,पकडलेल्या मालाच्या किमंतीत तफावत दाखवणे,मुख्य आरोपीला अभय देने,गुन्हा दाखल करतेवेळी कमकुवत कलमे लावणे यांची खरे तर चौकशी होने गरजेचे असुन यांनी प्रत्येक प्रकरणात आपले हात ओले केले अशी दबक्या आवाजात कुजबुज होत असुन यांच्या संपतीची इनकमटँस्क कडुन चौकशी करावी असे करदाता नागरिक बोलत आहे.
परळी शहरात 9 ऑगष्टला अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी 23लाखांचा गोवा,गुटखा पकडला होता तेंव्हा कारवाई उशीरा झाली व मुख्य गुटखा किंगला गुन्ह्यातुन वगळले , धर्मापुरी जवळ एक कोटी रूपयांचा गोवा,गुटखा SDPO राहुल धस यांच्या सुचनेवरून पो.उप.नि.चाँद मेंडके यांनी पकडला त्याला 48तास झाले मात्र बीड येथील अन्न व औषध प्रशासनाच्यां अधिकाऱ्यांनी
अजुन गुन्हा दाखल केला नाही व नेमका किती रूपयांचा माल आहे हे समजले नाही दोन दिवस होवुन सदर विभाग परळीत येवुन गुन्हा का दाखल करीत नाही का वेळ खाऊ पणा करून या वरचे जनतेचे लक्ष कमी झाल्यावर साठेलोटे करून प्रकरण रफादफा तर करायचे असे यांचे मनसुबे तर नाही ना अशी शंकेची पाल अन्न व औषध

No comments:

Post a comment