तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

नागरिकांनो सावधान.., गेवराईत दुचाकी चोरीच्या घटना घडल्या..सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १ _ चोरटय़ांनी दुचाकी चोरून नेण्याचा सपाटा लावला असून, शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. नागरीकांनी सावध रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसात दुचाकी मालकांनी तक्रारी केल्या आहेत.
        गेवराई येथील  जिल्हा परिषदेचे शिक्षक शंकर सुर्यवंशी यांची दुचाकी ( एम. एच. -ए -२३ व्ही. -१३७१ ) ३० ऑगस्ट रोजी शाळेसमोर उभी होती. अज्ञात चोरटय़ांनी सकाळी नऊ वाजता गाडी पळवली. दीपक रघुनाथ निकम यांची दुचाकी ( एम. एच. २३ - पी.-७०७७ ) ही २० जून २०१९ रोजी चोरटय़ांनी पळवली आहे. त्यांनी ही दुचाकी गाडी कृष्णाई बंगल्या समोर लावली होती. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही गाडी चोरीला गेली. लाॅक तोडून चोरटय़ांनी गाडी लांबविली आहे. गाडी मालकांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment