तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

खेळाडूंनी आपल्या खेळातून क्रीडा गुण दाखवावे असदुल्ला खान पठाण
आरूणा शर्मा


पालम :- खेळाडूंनी आपल्या खेळातून क्रीडा गुण दाखवावे खेळताना डोक्यावर बर्फ पायात भिंगरी असल्यास यश निश्चित मिळते यासाठी सतत परिश्रम आवश्यक असते असे प्रतिपादन पालम नगरीचे नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष असदुल्ला खान पठाण यांनी पालम तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. क्रिकेट स्पर्धा पालम जायकवाडी वसाहतीच्या मैदानावर आयोजन केले. या क्रीडा स्पर्धा 14. 17. 19. वर्षाखालील वयोगटातील खेळाडूच्या घेण्यात आल्या यावेळी तालुक्यातील 40 संघ उपस्थित होती खेळाडूंना मार्गदर्शन करताना पठाण म्हणाले क्रीडा स्पर्धेच्या वेळी खेळाडूंनी डोक्यावर बर्फ व पायात भिंगरी घेऊन आपला खेळ दाखवावा खेळ खेळत असताना सर्व खेळाडू आपल्या जाती-धर्माचा विचार न करता  एका मनाने खेळावे यातून खरी राष्ट्रीय एकात्मता दिसून येते. खेळाडूंनी आपल्या खेळाचे प्रदर्शन करताना आपल्या खेळातून क्रीडा गुण दाखवणे गरजेचे आहे परिश्रम केल्यास निश्‍चित यश मिळते यावेळी 14 व 17 वर्षे वयो गोटातून पालम तालूक्यातील जिल्हा परिषद प्रशाला बनवस प्रथम आला तर 19 वर्षा खालील ज्युनियर गटातून ममता कनिष्ठ महाविद्यालय पालम चा संघ प्रथम आला या तालुकास्तरीय क्रीडा यशस्वी करण्यासाठी तालुका संयोजक मोतीराम शिंदे, विजय दुधाटे, जी.आर. हिमटे, सचिन आडे, सय्यद सिकंदर, सचिन नंदेवार, मरीबा गायकवाड, डी.डी. दूधाटे, संतोष गायकवाड आदीनी परिश्रम घेतले.  विजयी झालेल्या संघाचे अभिनंदन प्राचार्य आर.के. क्षीरसागर, भगवान जाधव, बालाजी शिनगारे, बापू शेंडगे, मधुकर येवले, संजय पवार, यांनी केले.

No comments:

Post a Comment