तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

जन्मभूमी फाऊंडेशनच्या बंधा-याचा परिणाम;जलस्रोतांत पाणी खुळखुळले


प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील वाघाळा-फुलारवाडी  शिवारात जन्मभूमी फाऊंडेशन ने कुठल्याही शासकीय मदती शिवाय जिल्हा  प्रशासन आणि जायकवाडी पाटबंधारे विभागा कडून नाहरकत आणि गौणखनिज उत्खनना साठी परवानगी घेत सव्वा पाचशे मिटर लांबी चे खोली करण मे-जुन  महीण्यात पुर्ण केले होते.या बंधा-यात नुकतेच  जायकवाडीच्या कालव्या व्दारे पाणी साठल्याने या भागात अतिषय कमी प्रमाणात पाऊस झाला असतांनाही आता कोरड्या विहिरी आणि कुपनलिकांना पाणी खुळखुळत असल्याने शेतकरी आनंदून गेल्याचे चित्र दिसत आहे.
दुष्काळ ही संधी मानत गावागावात ग्रामस्थांचा सहभाग घेत जलसंधारणाची चळवळ उभी करण्याचा मनोदय  गतवर्षी जन्मभूमी फाऊंडेशनच्या स्नेह  मेळाव्यात एक मताने  निर्णय झाल्या नंतर यावर पदाधिका-यांनी तात्काळ काम सुरू केले. पाथरी तालुक्यात अनेक गावांना जायकवाडी चे पाणी मिळते. धरणात पाणी असल्यास बारमाही पाणी उपलब्ध होते.मात्र चा-यांची  नादुरुस्ती झालेली असल्याने लाखो लिटर  पाणी वाया  जाते हाच मुद्दा समोर ठेऊन ज्या भागात  असे प्रकार होतात.त्या ठिकाणी मुरुमाची खोली तपासून  खोलीकरण केल्यास शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा फायदा होईल. असा उद्देश समोर ठेवत जन्मभूमी फाऊंडेशन पदाधिकारी यांनी योग्य त्या प्रशासकीय मान्यता घेत वाघाळा येथे फुलारवाडी-वाघाळा  शिवेवर जायकवाडीच्या सांडव्याचे  जवळपास सव्वा पाचशे मिटर (अर्धा किमी)लांब सरासरी पंधरा फुट खोली आणि चाळीस ते पन्नास फुट रुंदी करण केले.विशिष्ट अंतरावर ठेवण ठेवली.पहील्या  टप्यातील ८० टक्के काम पुर्ण केले.आता या भागात  या वर्षी १ जुन पासून आज पर्यंत ५५५.६२ एवढे पर्जन्य मान अपेक्षित असतांना ३६१.३१ म्हणजेच सरासरीच्या  केवव ६६.५ एवढे पर्जन्यमान झाले असल्याने अजुनही जमिनिची पाणी पातळी वाढली नाही.परंतु गत महिण्यातील शेवटच्या आठवड्यात या भागात जायकवाडी कॅनॉलचे पाणी आल्याने हा बंधारा तुडूंब भरला  असल्याने या भागातील जलस्रोतांच्या पाणी पातळीत कमालीची  वाढ झाल्याने शेतकरी, आणि ग्रामस्थ आनंदून गेले आहेत. पावसाळा आणि कॅनॉल असे दोन्ही पाणी बारमाही या बंधा-यात  साठऊन जलस्र्तोतांची  पाणी पातळी वर्षभर कायम राहिल असे शेतकरी सांगत आहेत. जन्मभूमी फाऊंडेशन ने केलेल्या या कामाचे वाघाळा आणि पंचक्रोशितील नागरीकां मधून कौतुक होत आहे. या विषयी बोलतांना जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात म्हणले की, जन्मभुमी फाऊंडेशन नेहमीच शेतकरी हिता  साठी पुढाकार घेऊन काम करत आहे.या साठी वाघाळा ग्रामस्थांचे सहकार्य,पुढाकार महत्वाचा होता.सोबतच पाटबंधारे विभागाचे नाहरकत  प्रमाणपत्र आणि जिल्हाधिकारी पी शिवा शंकर साहेबांनी या साठी गौनखनिज उत्खननास दिलेली परवाणगी या मुळे हे काम यशस्वी होण्यास मदत झाली. आता वाघाळा येथे लवकरच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जलपुजनाचा भव्य कार्यक्रम ठेवणार असून इतरांना प्रेरणा घेण्या साठी निमंत्रित  करणाि असल्याचे सांगत या साठी ज्यांनी ज्यांनी मदत केली.अशा सर्वांचा या वेळी जन्मभूमी फाऊंडेशनच्या वतीने  स्मतिचिन्ह  देऊन सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a comment