तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 30 September 2019

ना.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत नमिता मुंदडा यांचा भाजपात प्रवेश ; बीड जिल्हयात राष्ट्रवादीला मोठा हादरा
ळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-        
   राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही ही गळती थांबावी म्हणून डॅमेज कंट्रोल साठी खुद्द शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन जी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली त्यातीलच एक उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनीच राष्ट्रवादीला धक्का देत आज दि.30 सप्टेंबर रोजी परळी येथे गोपीनाथ गड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला.  केज विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असून आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी परळी येथे प्रवेश करण्यात आला. यावेळी  नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, नमिता मुंदडा व मुंदडा कुटूंबिय लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन हा प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे

राज्याच्या माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय विमल मुंदडा या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर पक्षाने दोन वेळा मंत्रिपदाची जबाबदारी टाकली होती त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय मुंदडा आणि सुनबाई यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्याशी गेल्या साडेचार वर्षात अक्षय आणि नमिता यांचे पटत नाही तरीदेखील लोकसभा निवडणुकीत अक्षय मुंदडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम चोखपणे केले होते मात्र त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतून विरोध होत असल्यामुळे तेदेखील पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत होते ही गोष्ट लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड येथे जाहीर मेळाव्यात नमिता मुंदडा संदीप शिरसागर विजयसिंह पंडित प्रकाश सोळुंके आणि धनंजय मुंडे या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तरी अक्षय आणि नमिता हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार नाहीत असा अंदाज शरद पवारांना होता मात्र पवारांना खोटे ठरवत अक्षय आणि नमिता मुंदडा यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी येथील यशश्री या निवासस्थानी भेट घेतली.  आता पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या जादूच्या कांडीने फिरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस निष्प्रभ, शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांचा भाजपात प्रवेश केल्याने भाजपाचे आणखी वल्यवाढले आहे.व केज मतदार संघातील आपली उमेदवारी पक्की केली आहे.

No comments:

Post a comment