तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

परळीत श्री संत गुरूलिंगस्वामी पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहास प्रारंभ मनाच्या शुध्दतेसाठी पारायणाची आवश्यकता - वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकरपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.04 येथील श्री संत गुरूलिंगस्वामी यांच्या 118 व्या पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहास 02 सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे. 03 सप्टेंबर रोजी श्री गुरू 108 ष.ब्र.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या आशिर्वचनास सुरूवात झाली. यावेळी त्यांनी आपल्या आशिर्वचनातून पारायणाचे महत्व सांगितले, पारायणाने मनाची शुध्दता होते. मनाची शुध्दता होत नाही तोपर्यंत बुध्दी शुध्द होत नाही. मन व बुध्दी शुध्द करण्यासाठी पारायण करावे लागते. त्यामुळे अंत:करण, मन,वाणी पवित्र होते. परमेश्वर कसा आहे ते कळण्यासाठी साधु संतांणी सांगितल्या प्रमाणे पारायण करावे लागते असेही सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांनी सांगितले. संत श्री मन्मथस्वामींनी तुमच्या आमच्या जिवनात परमेश्वराच नात परमरहस्य ग्रंथातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिवध्यान, शिवपुजा याविषयीही त्यांनी मार्गदर्शन  केले. इष्टलिंगाच्या माध्यमातून हळूहळू शिवभक्ती करण्यास सांगितले. प्रपंचासाठी परमार्थ करावयाचा नाहीतर स्वत:च्या कल्याणासाठी करायचा आहे. 
येथील श्री संत गुरूलिंगस्वामी मठ संस्थान मध्ये विरशैव समाज परळीच्या वतीने श्री संत गुरूलिंगस्वामी पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहास उत्साहास प्रारंभ झाला आहे.
या सप्ताहा मध्ये दररोज शिवसहस्त्रनामावली, परमरहस्य व श्री पलसिध्द महात्म्य पारायण, मन्मथस्वामी गाथ्यावरील भजन, शिवपाठ आरती, वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांचे प्रवचन, किर्तन व जागर असे कार्यक्रम होत आहेत.
साखरखेर्डेकर महाराजांचे स्वागत श्री संत गुरूलिंगस्वामी मठसंस्थानचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी यांनी केले. निळकंठ स्वामी महाराज यांचे स्वागत शिवशंकरअप्पा निर्मळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मठसंस्थानचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके सचिव गिरीष चौधरी, विश्वस्त शिवकुमार व्यवहारे, रत्नेश्वरअप्पा कोरे, प्रा. रामलिंग काटकर, शंकरअप्पा उदगिरकर, किर्तीकुमारअप्पा नरवणे, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे, शिवशंकरअप्पा निर्मळे, अक्षय संजय मेनकुदळे,  यांच्यासह इतर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

No comments:

Post a Comment