तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचा मागाठणे विधानसभा मतदारसंघ क्रमांक – १५४, मतदारसंघ आरक्षण – खुला
विजयी उमेदवार :प्रकाश सुर्वे, शिवसेना – ६५,०१६
पराभूत उमेदवार :रतीलाल मेहता
भाजप – ४४,६३१
मतदारांची संख्या
पुरुष – १,७२,९१३
महिला – १,३४,८२२
एकूण मतदार – ३,०७,७३५


मागाठणे हा मुंबईच्या बोरीवली भागातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
उत्तर मुंबईतल्या चार मराठी विधानसभा मतदारसंघांपैकी मागाठणे हा एक मतदारसंघ आहे. मराठीच्या मुद्द्यावर इथल्या मतदारांनी नेहमीच उमेदवारांना साथ दिली आहे. त्यामुळे इथे जसे मनसेचे प्रवीण दरेकर २००९मध्ये निवडून आले, तसेच शिवसेनेचे प्रकाश सुर्वे २०१४मध्ये इथून विधानसभेवर निवडून गेले. २०१४मध्ये या मतदारसंघात ५२.७१ टक्के मतदान झालं होतं. या मतदारसंघात एकूण २७६ मतदान केंद्र आहेत.
विद्यमान आमदार – प्रकाश सुर्वे, शिवसेना
शिवसेनेच्या तिकिटावर प्रकाश सुर्वे हे २०१४मध्ये पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले. यांनी याआधी अनेक सहकारी संस्थांवर सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान सदस्य असलेले प्रकाश सुर्वे शिवसेनेत आले आणि त्यांना लॉटरी लागली. प्रविण दरेकर यांनी मागठाणे मतदारसंघात धडाकेबाज जनसंपर्क अभियान सुरु केल्यामुळे त्यांचे इरादे नेमके काय आहेत, याबाबत तेथे संशयकल्लोळ नाट्य सुरु झाले आहे. मतदारसंघात भेटी देऊन लोकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न असे या अभियानाचे स्वरुप आहे. विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये असून मुंबईत विविध ठिकाणी अनेक इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात अंतर्गत बांधणी वा कामे सुरु केली आहेत. मात्र यापैकी कोणीही दरेकरांप्रमाणे उघडपणे हालचाली सुरु केल्या नाहीत. सध्या शिवसेना भाजप युती असून मागठाणे मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत. त्यामुळे येथे शिवसेनेचा दावा असूनही दरेकर ज्या आत्मविश्वासाने हे अभियान राबवीत आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या गोटात विविध तर्क लढविले जात आहेत.
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) प्रकाश सुर्वे, शिवसेना – ६५,०१६
२) रतीलाल मेहता, भाजप – ४४,६३१
३) प्रवीण दरेकर, मनसे – ३२,०५७
४) सचिन सावंत, काँग्रेस – १२,२०२
५) सचिन शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस – २६९७
नोटा – १८६२
मतदानाची टक्केवारी – ५२.७१ %
*संकलन : पत्रकार बाळू राऊत*
*मोबाईल नंबर :7021249770*

No comments:

Post a Comment