तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 September 2019

पाथरी तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत वाघाळा शाळेचे यश

प्रतिनिधी
पाथरी:-क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी, तालुका जिल्हा परिषद पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने पीपी एल ग्राउंड पाथरी येथे आयोजित तालुकास्तर शालेय मुलिंच्या क्रिकेट स्पर्धे मध्ये वाघाळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेने अंतिम सामन्यात शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी संघास एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात हरवून तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. 19 वर्षातील मुलींच्या गटात  उत्कृष्ट अशी फलंदाजी व गोलंदाजी करत शेख मेहेर अनिस च्या ऑलराउंडर खेळा मुळे व राधा नागरगोजे च्या फलंदाजीच्या जोरावर अंतिम सामना एकतर्फी झाला. प्रथम फलंदाजी करताना कसापूरी संघाने पाच ओव्हर मध्ये 37 धावांचा लक्ष दिले होते. वाघाळा संघाने फलंदाजी करताना  4.2 ओव्हरमध्ये 38 धावा करून सामना १० विकेट्स ने आपल्या नावे केला. व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
     संघामध्ये शेख सुमेरा, दिव्या तांबे  शेख मेहेर अनीस राधा नागरगोजे, पूनम चव्हाण, शालिनी दत्ता घोडके, निकिता घोडके, मयुरी चाफाकानडे, पुनम नवघरे, कल्पना ताटे व वैष्णवी सोळंके या खेळाडूंचा समावेश होता.
      विजयी संघाचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. चव्हाण एस व्ही, स्वामी यु जी, कासले एस एस, धावारे शंकर, वाघ सचिन, बाबासाहेब नवघरे, सुशील घुंबरे, राधाकृष्ण गवारे, विनायक काळे, सुशीला किरवले आदींनी शुभेच्छा दिल्या. संघास क्रीडाशिक्षक शेख मुजीब यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment