तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 30 September 2019

ना. पंकजाताई मुंडे यांच्या जादूच्या कांडीचा धनंजय मुंडेंना दणका ; खुद्द शरद पवार यांनी जाहीर केलेल्या उमेदवार नमिता मुंदडा भाजपच्या तंबूत


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ३० ----- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाची चुणूक पुन्हा एकदा पहावयास मिळाली, त्यांच्या जादूच्या कांडीने धनंजय मुंडे यांना आज चांगलाच दणका दिला. खुद्द शरद पवार यांनी ज्यांची उमेदवारी जाहीर केली होती, त्या केजच्या नमिता मुंदडा यांनी आज ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.  

 गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड मध्ये येऊन पाच उमेदवारांची घोषणा केली होती.यामधील केज मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली होती.मात्र,राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना देखील नमिता मुंदडा यांनी आज गोपीनाथ गडावर येऊन भाजपात जाहीर प्रवेश केला. प्रवेशापूर्वी नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, नमिता मुंदडा यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान, 
या प्रवेशाने ना. पंकजाताई मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना मोठा दणका दिल्याचे मानले जात आहे. 

मेगा भरतीची सुरवात मीच केली - ना. पंकजाताई

नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय सर्वांच्या चर्चेनंतर आणि विचारपूर्वकच घेतला आहे. मुळचे भाजपचे असलेले मुंदडा पुन्हा स्वगृही परतले याचा आनंद आहे. अक्षयला माझे आशीर्वाद आहेत असे ना. पंकजाताई म्हणाल्या. खरे तर भाजपमध्ये मेगा भरतीची सुरवात धस यांच्या प्रवेशाने आम्हीच बीडमधूनच केली, हा जिल्हा राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तथापि हा जिल्हा मुंडे साहेबांचा बालेकिल्ला होता, आहे व विधानसभा निवडणूकीनंतरही राहील असा विश्वास त्यांनी एका प्रश्नांवर बोलतांना व्यक्त केला. 

किरायेदार आमच्या घराचे मालक झाले
अक्षय मुंदडा यांचे शरसंधान

गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या आम्हाला संपविण्यासाठी होत्या, त्याकरिता धनंजय मुंडे यांनी आटोकाट प्रयत्न केले, शरद पवारांपासून आम्हाला दूर ठेवण्यात आले, अनेक ठिकाणी डावलेले, जाणीवपूर्वक बाजूला फेकले  अशा शब्दांत अक्षय मुंदडा यांनी शरसंधान साधले. पंकजाताई यांच्याशी माझं कौटूंबिक नात आहे, आता आईची उणीव ताईंनी भरून काढली आहे. ना. पंकजाताई यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी अधिक ताकदीने काम करणार आहे असेही ते म्हणाले.

No comments:

Post a comment