तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

गणपती विशेष माहिती अष्टविनायकांची गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया


ढोल तश्याच्या गजरात गणेशाचे आगमन मोठ्या थाटात झाले.
गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती  असेही नाव या देवतेस आहे. संपूर्ण जगभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विद्येची आणि बुद्धीची देवता विघ्नहर्ता सर्वाच्या दुःखाचे निवारण करत असतो.
*गणपतीच्या आख्यायिका*
पार्वतीने एकदिवशी नंदीला दरवाज्यात उभा करून आंघोळ करण्यास निघून गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली.शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास दारी नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे  कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी तिज शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्तिली. शंकरांनी होकार भरला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला.
*गणपतीची विविध नावे* गणपतीची बारा नावे १.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन
*अन्य नावे/ नामांतरे*
ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण
 गणपतीचे वाहन : उंदीर, शस्त्र : पाश, अंकुश, परशु, दंत
वडील : शंकर, आई : पार्वती
पत्नी :ऋद्धी, सिद्धी
मंत्र : ॐ गं गणपतये नमः
एक नजर अष्टविनायक गणपती विषयी
*रांजणगावचा महागणपती*
 पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव हे एक लहानसे गाव पुणे नगर रोडवर लागते . रस्त्यापासून जवळच गणेशाचे मंदिर आहे . मंदिराचे दगडी पोत आणि आसपासच्या ओवऱ्या यांची बरीच पडझड झालेली आहे . हल्लीच्या देवस्थान कमिटीने या गोष्टीकडे लक्ष घालून जीर्णेद्धार करावयाचे काम हाती घेतले आहे . प्राचीन काळी त्रिपुरासूराला ठार मारण्याची शंकराला प्रेरणा देणारा हा श्री गणपती होय . या मंदिराचा दरवाजा पूर्वेकडे आहे . देवळाचा मुख्य गाभारा आणि मंडप अजूनही चांगल्या स्थितीत आहे . मराठे शाहीतील अनेक सरदारांनी या देवळाला इनामे दिली होती . या मंदिरातील दोनही गाभारे थोरले माधवराव पेशवे यांनी बांधल्याची नोंद आहे . हा गणपती उजव्या सोंडेचा आहे . असे सांगितले जाते . की , अगदी प्राचीन काळी मूर्ती खाली तळघरात आहे . तिला दहा तोंडे आणि वीस हात आहेत . छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिराला व्यवस्थेसाठी पहिली सनद दिली आणि थोरले माधवराव पेशवे यांनी हा गाव व्यवस्थेसाठी इनाम दिला . येथे फक्त एस . टी . नेच जाता येते . रेल्वेने नाही . या शिवाय इतरही गणेशस्थाने महाराष्ट्रात आहेत . प्राचीन कालापासून या स्थानांचे महात्म्य सांगितले आहे .
  *पालीचा बल्लाळेश्वर*
 रायगड जिल्हयात सुधागड तालुक्यात पाली हे गाव आहे . अगदी देवळाच्या जवळच सरसगड आहे . बाल बल्लाळाला प्रत्यक्ष दर्शन देणारा विनायक म्हणून बल्लाळेश्वर किंवा बल्लाळ विनायक होय . चिमाजी अप्पा पेशवे यांनी येथील मंदिराला एक मोठी घंटा दिली आहे व येथील मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला . सध्याच्या या मंदिराचा गाभारा पंधरा फूट उंच आहे . उंदराची मूर्ती हातात मोदक घेऊन उभी आहे . सभामंडप चाळीस फूट लांब आहे . देवळासमोर दोन उत्तम प्रकारे बांधलेली तळी आहेत . पण या तळ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तळी पाण्याने भरलेली असूनसुद्धा त्यांचा फारसा उपसा होत नाही व वापरही होत नाही . विनायकाची मूर्ती तीन फूट उंच आहे . सिंहासन दगडी आहे . विनायकाच्या डोळ्यात व बेंबीत खरे हिरे आहेत . विनायकावर ऋद्धिसिद्धीच्या मूर्ती चौऱ्या ढाळीत आहेत . सभामंडपात दोन मोठाले हत्ती आहेत . माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . येथे एस . टी . नेच जाता येते .
*महाडचा वरद विनायक*
 रायगड जिल्

No comments:

Post a Comment