तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

संस्कार प्रा शाळेत शिक्षक दिन साजरापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
संस्कार प्रा शाळेत आज दिनांक ०५ सप्टेंबर २०१९  गुरुवार रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका गित्ते पी आर मॅडम अध्यक्ष म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे सर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या प्रसंगी बोलताना शाळेचे सचिव दिपक तांदळे असे म्हणाले कि,भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. कारण डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला .पूर्वीच्या काळी गुरुगृही राहून शिक्षण घेतले जात होते. आताही गुरुकुल योजनेखाली चालणार्या अनेक संस्था आहेतच. पण खंत एकाच गोष्टीची वाटते ती म्हणजे पूर्वी इतका सन्मान गुरूंना मिळत नाही. अनेक जणांचं मत असंही येतं की, शिक्षकांनी स्वत:च स्वत:चं आत्मपरीक्षण करावं. बर्याच वेळा असं होतं, शिक्षकांमध्ये हजारातील एकाकडून एखादी चूक घडली की, सार्याच शिक्षकांकडे त्याच नजरेने पाहणे चुकीचे आहे. अशा प्रकारे खोचक मत त्यांनी मांडले या नंतर कार्यक्रमाचा समारोप श्री जगताप सर यांनी केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उरगुंडे सर यांनी केले.

No comments:

Post a Comment