तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 11 September 2019

तेल्हारा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उत्साहात आयोजन


तेल्हारा 
प्रतिनिधी.
 तेल्हारा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा क़ीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत.या स्पर्धेत योगा, बुद्धीबळ ,कबड्डी, हाँलीबाल, मैदानी खेळ, खो खो यासह विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .या स्पर्धेतील खो खो या तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन 11 सप्टेंबर 2019 रोजी सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड येथे खो खो स्पर्धा संपन्न झाली आहे या स्पर्धा च्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे हे होते तर उदघाटक हिवरखेडचे केंद्रप्रमुख मनीष गिर्हे, प्रमुख उपस्थितीत शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल भुजबले, तालुका क्रीडा संयोजक क्रांतिकुमार सावरकर,पर्यवेक्षक राजेंद्र तायडे, प्रदीप राऊत,राजेंद्र कोरडे,नितीन मंगळे, सौ.कल्पनाताई राऊत, विलास बुरघाटे,नवनाथ कोरडे,जावेद शाह,अमोल ढोकने हे होते .कार्यक्रम सुत्रसंचालन प्रा.संतोषकुमार राऊत  तर आभार प्रा.गणेश भोपळे यांनी केले आहे. विशेष म्हणजे पाऊस सुरू असताना सुध्दा खेळाडू मध्ये खो खो खेळण्याचा खुप ऊत्साह होता. सर्व विजयी संघाचे तालुका क्रीडा समितीच्या वतीने अभीनंदन करण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,कर्मचारीवृंद व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी योगदान दिले आहे.

No comments:

Post a Comment