तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 October 2019

विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्याची मागणीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी तालुक्यातील खरीप हंगाम व रब्बी हंगामातील भरलेला पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 
       शेतकऱ्यांनी पिक विमा भरताना सर्व कागदपत्र सादर केलेली असताना पुन्हा सुचना फाॅर्मची गरज काय ? १००% नैसर्गिक आपत्तीत शेतमालाचे नुकसान जग जाहीर असताना , पुरावा कसला पाहीजे ? तसेच पिक विमा भरतानाची पावती देताना त्याची प्रत व यादी विमा कार्यालय व कृषि विभागा कडे असताना पुन्हा पावती झेराॅक्स अशा साठी ? का झेराॅक्सची दुकाने चालवण्यासाठी ? त्यास बरोबर ७/१२ वर पिकाची नोंद तलाठी कार्यालयाने केलेली असताना पुन्हा ७/१२ का मागवता ?  का जागेवर बसूनच शेतमालाचे पंचनामे करण्याचे आदेश आहे का ? तलाठी , ग्रामसेवक व संबंधित कृषी कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावेत हेच अपेक्षित आहे , शेतकर्यांना पळवू नये व पिळवूही नये ! तसेच सर्व ग्रामपंचायती मार्फत नैसर्गिक आपत्तीत १००% नुकसानभरपाई साठी १००% पंचनामे करावेत असे ठराव विहीत मार्गाने शासनाकडे सादर करण्यात यावेत अशी मागणी परळी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.

दिवाळीत दिला मेहकर एस टी आगाराने जुन्या आठवणींना उजाळा!टिकिट मशीन कमी असल्या कारणाने जुन्या टिकिट बॉक्सवर कढावे लागत आहेत. 

मेहकर आगाराच्या ग्रामीण भागातील श्येड्युल साठी वापरावी लागत आहे तिकीट बॉक्स.

डोणगांव :- १
मेहकर आगार हा बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा आगार आहे मात्र या आगाराने सध्या दिवाळीमधे लहान मुलांचे कुतूहल जागृत केले त्याना टिकिट बॉक्सचे दर्शन झाले एरवी टिकिट बॉक्स दिसत नव्हते मात्र मेहकर आगाराच्या नविन्यापूर्ण कु नियोजनाच्या नमुन्याने लहान मुलांना तिकीट बॉक्सचे दर्शन झाले. मेहकर आगारात कागदावर १०२ बेसेस आहेत तर ८४ बेसेस प्रत्यक्षात रस्त्यावर धावत आहेत अश्यात दिवाळीच्या तयारी साठी मेहकर आगाराने खूप मेहनत घेतली बसेस रस्त्यात बंद पडूनये यासाठी बसेसचे मेंटनस केले त्यामुळे बसेस चांगल्या झाल्या व त्या बेसेस मधे प्रवाश्याचे तिकीट काढण्या साठी १०० च्या जवळपास टिकिट मशीन पाहिजे मात्र प्रत्यक्षात ६० ते ६२ मशीन आहे यातील काही मशीन मधे चार्जिंगचा प्रश्न निर्माण होतो तर ३५ वाहकांना तिकीट मशीन अभावी मॅन्युअल तिकीट बॉक्स वापरावा लागत आहे. तिकीट मशीन नसल्या कारणाने मेहकर आगारातून ग्रामीण भागात चालणाऱ्या ३५ शेड्यूल साठी वाहकाला टिकिट बॉक्स वापरावे लागत आहेत अश्यात दुरून प्रवास करीत मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवाळी निमित्य मामाच्या गावाला जायच्या वेळेस मेहकर आगाराचे कंडक्टर मामा टिकिट फड़ताना दिसतात तेव्हा लहान बालके ज्याणी कधीच टिकिट व टिकिट बॉक्स पाहिले नव्हते त्याना टिकिट बॉक्स व टिकिट पाहायला मिळाले.एकीकडे एस टी महामंडळ व प्रवासी दोन्ही स्मार्ट कार्ड वापरण्यावर भर देत आहेत अश्यात एस टी ने वयोवृद्ध लोकांना स्मार्ट कार्ड काढायला लावले मात्र हे स्मार्ट कार्ड तिकिटावर वापरायचे कसे हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे.

  जमील पठाण
8805381333

गेवराई येथील महेश इंडस्ट्रीजच्या ऑइल मीलची भींत कोसळली

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३१ _ गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दोन दिवस झाले पाऊस उघडला असला तरी ओलावा कायम आहे. दरम्यान गेवराई येथील महेश इंडस्ट्रीजची भींत कोसळली गेल्याने मोठी अर्थिक हानी झाली आहे.
           याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई व परिसरात जोरदारपणे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या शेतातील बाजरी, कापूस व इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या अर्थिकतेवर घाला घालण्याचे काम आता वरुणराजाने सुरु केले आहे कि काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दोन दिवसापूर्वीच गेवराई शहरातील आधार हॉस्पिटल नजिक असलेल्या श्री. संताजीनगर भागातील डॉ. गणेश सदाशिवआप्पा मोटे यांचे राहते घरावर अचानकपणे रात्री १:२५ वाजण्याच्या दरम्यान वीज कोसळली. दैैैव बलवत्तर असल्याने सुुदैवाने हानी टळली. दरम्यान विद्युतवर चालणारे टि. व्ही, फॅन, एसी आदी उपकरणे जळाली आहेत. आणि आता पुन्हा बुधवारी रात्री पाऊस होऊन गेवराई येथील ताकडगाव रोडवरील महेश इंडस्ट्रीजच्या ऑइल मीलची भींत कोसळली गेल्याने मोठी अर्थिक हानी झाली आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

गेवराई तालुक्यातील रांजणीच्या भागूबाई सावंत यांचे निधन


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३१ _ तालुक्यातील रांजणी येथील रहिवासी श्रीमती भागूबाई दादाराव सावंत (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी ( दि.३१ ) दुपारी 2 वाजता निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
        भागूबाई सावंत या गेल्या पंधरा दिवसापासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी (दि.३१) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, कृषी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पाश्चात गोरखनाथ सावंत, मच्छिन्द्र सावंत, जालिंदर सावंत ही तीन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे. दै. कार्यरंभचे उपसंपादक तथा रांजणीचे माजी सरपंच गणेश सावंत यांच्या त्या आजी होत. सावंत कुटुंबियांच्या दुःखात दै. झुंजारनेता सहभागी आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

पदवीधर मतदारांनी लवकर नाव नोंदणी करावी– विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर


औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ ‍निवडणूक

औरंगाबाद (जि.मा.का) :– औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी राजकीय पक्षांशी आज संवाद साधला. तसेच सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी पदवीधर मतदार नोंदणी लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली.

विभागीय आयुक्त यांच्या दालनात श्री. केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त ‍शिवाजी ‍ शिंदे,  उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ (३) अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी ०१ ऑक्टोबरपासून जाहीर केलेला आहे. मतदार नोंदणीसाठी एक ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत पात्र पदवी अहर्ता, पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना नं.१८ मध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. या नोंदणीसाठी एक नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष अगोदर पात्र पदवी अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका इ. धारण करणा-या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. नमुना १८ च्या अर्जासह मूळ कागदपत्रे अथवा राजपत्रित अधिका-याकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी परीक्षेची, पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रक देखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणित झाले असले पाहिजे. शासकीय कार्यालयात सामाजिक उपक्रमामध्ये काम करणा-या व्यक्तीच्या अर्हताबद्दल संस्थेकडील अभिलेख पाहून कार्यालय प्रमुखांना मतदार नोंदणीसाठी विहित नमुन्यात प्रमाणपत्र देता येईल. तसेच विद्यापीठांकडील पदवीधारकांची नोंदणी, अभियंत्यांची नोंदणी, विधी अभिकर्त्याची नोंदणी, वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी , सनदी लेखापालांची नोंदणी आदी नोंदणीबाबतचा दाखला अर्जासोबत अर्हतेबाबत पुरावा म्हणून देता येईल. तसेच राजकीय पक्ष संघटना अथवा कोणत्याही व्यक्तीस एका गठ्ठा अर्ज मिळणार नाहीत, तसेच एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारलेही जाणार नाहीत. मात्र, एका कुटुंबासाठी अथवा कार्यालय प्रमुख अथवा संस्थेस त्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांसाठी अर्जाची एकत्रित मागणी करता येईल व एकत्रित अर्ज सादर करता येतील.

           प्राप्त मतदारांची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येऊन २३ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबरपर्यंत संबंधितांना दावे, हरकती नोंदविता येतील. दिनांक ३० डिसेंबर रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. ‍विभागातील सर्व शासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे यांनी पदवीधर मतदार नोंदणीला प्राधान्य द्यावे व अधिकाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी करावी.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रशिक्षण

जिल्हाधिकारी  कार्यालयात 31 ऑक्टोबर 2019 रोजी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सकाळी अकरा वाजता हे प्रशिक्षण होणार आहे.

परळी-बीड रोडवरील त्या खड्ड्याने पुन्हा घेतला एका मातेचा बळी माहेरी जात असलेल्या महिलेचा खड्यात पडून मृत्यू ; दरवर्षी हा खड्डा घेतोय बळी, गरोदर महिलेचा सुद्धा इंथ झाला होता मृत्यू


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दरवर्षी सिरसाळा  - दिंद्रुड ह्या मार्गावरील  खामगाव फाटा नजिक असलेला रस्त्यावरील खड्डा निष्पाप लोकांचा बळी घेत आहे. तरी पण संबधीत साबां. विभाग लक्ष देत नाही. गरोधर मतेला ह्याच खड्ड्यात आपला प्राण गमवल्याच्या घटनेला वर्ष- दीड वर्षं ही होत नाही तोच दोन दिवसा पुर्वी एका शेतकरी मातेला  माहेरी जात असतांना दुचाकिवरुन पडून आपला प्राण गमवावा लागला आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी कि, दिनांक २८ रोजी  दैवशाला केशव पौळ वय ४० वर्षे रा . कासारवाडी/ रामेवाडी, ह्या आपल्या माहेरी उपळी येथे मुलगा माऊली समावेत दुचाकिवरुन जात होत्या.
    सिरसाळा  - दिंद्रुड  रोड वरिल खामगाव फाटा नजिक असलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात गाडी अदळली व दैवशाला पौळ ह्या खाली पडल्या . त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ परळी, अंबाजोगाई, लातूर येथे उपचारासाठी दाखल केले परंतु गंभीर दुखापत झाली असल्याने  त्यांचा उपचारा दरम्यान दिनांक २९ रोजी मृत्यू झाला. 
    ऐन दिवाळी सारख्या सणाच्या काळात असा दुर्दैवी घटना घडल्य ने सारे कासारवाडी/ रामेवाडी गाव शोकाकूल होते. 
    ह्या खड्डा मुळे अत्ता पर्यंत कित्येकांच्या घरात सरणं रचले  गेले .याला नुसता हा जबाबदार नसुन संबधीत सांबा विभाग सुद्धा जबाबदार आहे. या ठिकाणचा रस्ता तात्काळ दुरुस्त झाला पाहिजे नाही तर हा खड्डा अनेकांचा बळी घेईल. 

 सांबा विभाग काय झक मारतयं का  ?
    सिरसाळा  - दिंद्रुड रोड खामगाव फाटा नजिक ह्या ठिकाणी नेहमीच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. येथील हा खड्डा अनेकांचा बळी घेत आहे. सांबा विभाग च्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारा मुळेच लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. लोकांचे जिव जात असतांना सुद्धा संबधीत सांबा विभाग लक्ष देत नाही. काय झक मारतयं का  ? हे विभाग? संबधीत प्रशासन आणि संबधीत गुत्तेदार यांच्यावर  कलम  ३०२ चा गुन्हा दाखल करायला हवा. अशी तिव्र संताप जनक प्रतिक्रिया रामावाडी ग्रामस्था भगवान पौळ पाटील यांना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

रेशन‌ दुकानावर निकृष्ट दर्जाचा गहु तांदूळ.; शासनाकडून गरिबांची क्रुर चेष्टाअंबाजोगाई (प्रतिनिधी) :- ऐन दिवाळीच्या सणात रेशन दुकानावर अगदी जनावरे देखिल खाणार नाहीत असा अत्यंत निकृष्ट दर्जाचा गहु, तांदूळ वाटप केला गेला जात असून शासन व प्रशासन गरिबांची क्रुर चेष्टा करत असल्याचे चित्र दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित आमदार सौ.नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सर्व राशन दुकानदारांना भेटी देऊन तात्काळ गहु तांदूळ वाटप करा अशा सुचना केल्या त्या नुसार ऋ अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे तर एक किलो साखर ही पुढच्या महिन्यात देऊ असे सांगण्यात येत आहे.
अंबाजोगाई तहसिलदार यांचे पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वर धाक दिसुन येत नसुन या प्रकाराकडे पुर्ण दुर्लक्ष होताना दिसत असुन त्यांना या विषयी कल्पना नाही की ते जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत अशी चर्चा शहरात होताना दिसत आहे. या पुर्वीही पुरवठा विभागात अनेक भ्रष्टाचाराचे प्रकारामुळे चर्चेत राहिला आहे.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्या साठी खा पवार परभणी-हिंगाेली जिल्हा दाै-यावरमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची येत्या बुधवारी पाहणी करणार आहेत.

यावर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

 शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना धीर देण्यासाठी स्वतः पवार साहेब हे येत्या बुधवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत . आपल्या या दौर्यात पवार हे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे त्यांच्यासोबत या दौर्यात असणार आहेत.

 बुधवार दिनांक 6 रोजी दुपारी बारा वाजता ते सर्वप्रथम सेलू व परिसरातील नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर परभणी व परिसरातील व त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

झेनित कॉम्प्युटरच्या वतीने अल्पवेतन कामगार व शेतकर्‍यांच्या मुला-मुलींसाठी मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण शिबीरपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
परळी तालुक्यातील व शहरातील अल्पवेतन कामगार व शेतकर्‍यांच्या मुला-मुलींसाठी मोफत कॉम्प्युटर राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या प्रशिक्षण शिबीराचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन झेनित कॉम्प्युटरच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यातील व शहरातील अल्पवेतन कामगार व शेतकर्‍यांच्या मुला-मुलींसाठी झेनित कॉम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने बीसीसी, एमएस-ऑफिस, डीटीपी, टॅली ९.०, डाटा इंट्री ऑपरेटर या सर्व कॉम्प्युटर कोर्सचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शालेय विद्यार्थी व महिलांसाठीही मोफत शिबीर होणार आहे. तरी अल्पवेतन कामगार व शेतकर्‍यांच्या मुला-मुलींसाठी, विद्यार्थी यांनी दि.०९ नोव्हेंबर पर्यंन्त या प्रशिक्षण शिबीरासाठी नाव नोंदणी करुन घेऊन आपला प्रवेश आजचा करुन घ्यावा असे आवाहन झेनित कॉम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने करण्यात आले आहे. ८८८८५५७४४४ या नंबरवर संपर्क साधावा.

परळीत डेंगुचे थैमान तापीच्या रग्णांनी हॉस्पिटल भरलीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी शहरात डेंगुने थैमान घातले असुन ताप व रक्तातील पेशा कमी होण्याने खाजगी दवाखाने खचाखच भरली आहेत.उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपजिल्हा रुग्णालयात असंख्य रुग्ण तापीचे असुन यापैकी दोघांना डेंगुची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे तर वेगवेगळ्या  खाजगी दवाखान्यात अनेक रुग्ण उपचार घेत आहेत दोन दिवसांपूर्वी भिमनगर भागातील आनंद रोडे या युवकाचा डेंगुमुळे मृत्यु झाला आहे.या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे.

    मागील अनेक दिवसापासून शहरातील अनेक भागात तापाची लागन झालेले  रुग्ण दाखल होत आहेत सध्या परळी उपजिल्हा रुग्णालयात 23 रुग्ण तापीचे असुन यापैकी  सय्यद सिफा रा.पेठ मोहल्ला व रेहान बागवान रा.इंदिरा नगर, या दोन्ही रुग्णांना डेंगुची लागन झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.एकट्या कराड हॉस्पिटल मध्ये डेंग्युच्या सहा रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.शहरातील आनंद हॉस्पीटल,समर्थ हॉस्पिटल,मुंढे बालरुग्णालय,जाजु हॉस्पीटल अशा अनेक खाजगी दवाखान्यामध्ये 45 ते 50 डेंग्युची लागन झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे.शहरातील अनेक भागात घाण साचलेली आहे यातच मागील दहा दिवसापासुन सुरु असलेल्या परतीच्या पावसाने सखल भागात पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंगु व मलेरिया चा फैलाव होत आहे. न.प.कर्मचारी आणखीही निवडणुकीच्या वातावरणातुन बाहेर पडलेले नसल्याने शहराची स्वच्छता मंदगतीने होत आहे.डासांचा फैलाव होवु नये म्हणुन करण्यात येणारी फवारणी  झालेली नसल्याने डेंगु,मलेरिया व तापीची साथ पसरली आहे. 
उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार 
 तापीची लागन झालेले रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत.परंतु या रुग्णालयातील अनेक विभाग बंद आहेत.डेंगुच्या या रुग्णांना डेंग्युची तपासणी करणारी यंत्रणा परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात नसल्याने खाजगी लॅब मध्ये तपासणी करावी लागत आहे.खाजगी डॉक्टरांकडून या तपासणीसाठी 400 ते 450 रु.आकारले जात आहेत.उपजिल्हा रुग्णालयात रक्त तपासणीची यंत्रणा नसल्याने व वैद्यकिय अधिक्षक डॉ.रामेश्वर लटपटे यांचा रुग्णालयातील कर्मचार्यावर अंकुश नसल्याने व त्यांना आपल्या खाजगी रुग्णालयातच अधिक रस असल्याने सरकारी रुग्णांना आर्थिक भुर्द॔ड सोसावा लागत आहे.

'रन फॉर युनिटी' बीड येथे राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न

बीड (जि.मा.का.) :-  सरदार वल्लभभाई पटेल यांचा  दि. 31 ऑक्टोबर हा जन्म दिवस 'राष्ट्रीय एकता दिन' म्हणून दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. या वर्षीही आज (31 ऑक्टोबर) सकाळी  ८ वाजता  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
        जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर दौड सुरू झाली. राष्ट्रीय एकता दौडमध्ये उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) प्रकाश आघाव पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपजिल्हाधिकारी श्रीकांत सुकटे, पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सानप, राज्य युवा पुरस्कार प्राप्त तत्वशील कांबळे, लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक राजकुमार पाडवी, धनेश करांडे, नानाभाऊ हजारे, विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस जवान, पोलीस बॅन्ड पथक, क्रीडा मंडळ, महिला, क्रीडाप्रेमी, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 
        एकता दौड सकाळी ८.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु होवून  छत्रपती शिवाजी चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या मार्गाने जावून जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाली व समारोप प्रसंगी उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. दौड दरम्यान सहभागी मान्यवरांनी  राष्ट्र प्रेम व्यक्त होणाऱ्या, देशाच्या एकात्मतेविषयी प्रोत्साहन देणाऱ्या घोषणा दिल्या. यानंतर पोलीस बॅन्डने वाजविलेल्या राष्ट्रगीताच्या धूनने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित  राष्ट्रीय एकता दिन  दौड कार्यक्रमाची सांगता झाली.

यशवंत थोरात यांची मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवडऔरंगाबादच्या मैत्र मांदीयाळी प्रतिष्टाण मुळे जिवनात क्रांती घडली -यशवंत थोरात

केज (प्रतिनिधी) :-

 घरातील आठराविश्व दारीद्र्य,मोल मजुरी करत मैत्र मादीयाळी संस्थेने दत्तक घेतलेल्या ढाकेफळच्या यशवंत थेरात ने महाराष्ट्र लोकसेवा परिक्षेच्या माध्यमातुन सलग तिन परिक्षेत नाविण्यपुर्ण यश संपादन केल्याने सर्व स्थरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे 

तालुक्यातील ढाकेफळ हे गाव सध्या अधिकाऱ्याच गाव म्हणुण तालुक्यात ओळखल जाऊ लागल आहे या पुर्वी येथीलच उदय चटप हे आर्मीमध्ये कर्णल (अरुणाचल प्रदेश ) हे युपीएससी मधुन यश संपादन केले तर लोकसेवा परीक्षेतुन गोवींद चटप हे पो उपनिरीक्षक तर सदानंद थोरात हे ईन्कमटँक्स आँफिसर म्हणुन या पुर्वी निवड झाली आहे.

यशवंत थोरात याचे शिक्षण सातवी पर्यत जि प शाळा ढकेफळ सिद्धीविनायक माध्यमीक कुभेफळला दहावी पर्यत तर १२ वी रामराव पाटील व पदवी शिक्षण वसंत महाविद्यालय केज या ठिकाणी  पुर्ण केले हे शिक्षण पुर्ण करत आसतांना घरातील आठराविश्व दारीद्य २ एक्कर कोरडवाहु जमीनीतील नापिकी मुळे ईतरांच्या शेतात मोलमजुरी केल्या शिवाय घरची चुल पेटत नव्हती आई वडील भाऊ व दोन बहीणी असे कुटुंबाने जिवन जगण्याचा संघर्ष केला अधिकारी होण्याच स्वप्न बाळगल्याने पुणे- औरंगाबाद एमआयडीसीत विविध कंपनीत रोजदारीवर दिवसामजुरी व रात्री आभ्यास करतांना अनेक अडचनिचा सामना केला परंतु यश मिळत नव्हते कामातुन मिळनारा तुटपुंजा पगारातुन शिक्षण पुर्ण होत नसल्याने आई वडील भाऊ बहीनींनी गावी मोलमजुरी करून यशवंतला पैसा पुरवला परंतु वाढती महागाई पाहता खर्च झेपत नसल्याने व आभ्यासातील सातत्य पाहता जालना येथील मैत्री मादीयाळी या संस्थेच्या यशवंत थोरात संपर्कात आल्याने यशवंतची जिद्द व चिकाटी व मेहनत पाहता भावी शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय श्री अजय किंगरे यांनी घेत जो पर्यत नौकरी लागत नाही तो पर्यत सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध करत शौक्षणीक खर्च ही उपलब्ध केला म्हणुनच आज यशवंत हा यश मिळवु शकला .
यशवंत निळोबा थोरात यांनी २०१८ला AIO असिस्टंट ईंटेलिजन आँफिसर राज्य गुप्त वार्ता परिक्षे मध्ये यश मिळवले होते तर २०१८-१९ च्या लोकसेवा पऱीक्षेत  Psi sti व Aso असिस्टंट सेक्शन आँफीसर(कक्ष अधिकारी मंत्रालय मु़बई) या  तिन पदाच्या परिक्षेत नाविन्यपुर्ण यश मिळवले आजही यशवंत यांचा परिवार आजही शेजारच्याच्या भिंतीचा आधार घेवुन समोर पत्र्याचे छप्पर मध्ये राहतात लवकरच राज्याच्या मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणुण जन सेवेसाठी रूजु होनार आसल्याने यशवंत थोरात यांना पुढील सर्वस्थरातुन  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गरजुंना ग्रुपच्या माध्यमातुन मदत-अजय किंगरे
जालना औरंगाबाद येथील २० मित्रांनी मिळुन मैत्र मांदीयाळी संस्थेची स्थापना करून प्रती महीना २०० रू प्रमाने आम्ही मदत जमा करतो व राज्यातील गरजु सामाजीक संस्था व  पिडीतांना आम्ही मदत करतो या मध्यामातुन आम्ही राज्यातील २५ गरजु मुल-मुली शैक्षणीक  गुणवत्ता तपासनी करूनच आम्ही दत्तक घेतल्या आसुन या तिन वर्षात अनेक मुल मुली प्रशासनात विविध पदावर काम करत आहेत २०१४ ते आज पर्यत जवळपास १ कोटीच्या वर मदत आम्हाला जालना व औरंगाबाद या ठिकाणाहुन मदत मिळाली आहे या मदती मधुन आम्ही वृधाश्रम एचआयव्ही अनाथ व शैक्षणीक गुनवत्तेतील गरजुना मदत केली आहे व मैत्र मांदीयाळी मुळे अनेकांच्या दुख:त सहभागी होत त्यांची दुख:निवारणास हातभार लावुन च्याचे जिवन आनंदी केल्याने आजपर्यच्या मदतीचा गरजुनी गैरवापर न करता योग्य ठिकाणी वापर झाल्याने आम्हास सार्थ अभिमान व आनंद आहे 

    अजय किंगरे
संचालक:- मैत्र मांदीयाळी प्रतिष्टाण जालना

अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळात तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बीड (जि.मा.का.) : - बीड जिल्हयातील विविध महसूल मंडळनिहाय स्थितीचा आढावा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला असून शासन निर्णयानूसार पंचनामे करुन अतिवृष्टी झालेल्या जिल्हयातील महसूल मंडळ आणि गावांमध्ये तातडिने कार्यवाही करण्याचे आदेश तहसिलदार यांना दिले आहेत. बीड जिल्हयातील सरासरीच्या तुलनेत 93.52 टक्के पाऊस झाला असून जिल्हयातील सरासरी एकूण प्रमाण 623.2 मि.मी आहे.

ऑक्टोबर,2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काही जिल्हयात शेतीपिकांचे नुकसान झाले असल्याचे निर्दशनास आले आहे. या नुकसानीसंदर्भात बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तातडीने मदत देण्याचे निदेश मा.मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. ही बाब विचारात घेता ज्या महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे  अशा महसुली मंडळामधील शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी  हे निर्देश दिले आहेत.

मो.यूसुफ पुंजानी यांचा काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश


मुंबईत काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेतला प्रवेश

फुलचंद भगत
कारंजा- तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात भारीप बहुजन महासंघाचा दबदबा निर्माण करणारे तसेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर कारंजा मानोरा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे बहुजनाचे नेते हाजी मो. युसुफ पुंजांनी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर काॅंग्रेसपक्षात प्रवेश केला. ३१ आॅक्टोंबर रोजी मुंबई येथील काॅंग्रेस कार्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.   

यावेळी काॅंग्रेसचे वरिष्ठ नेेते गुलाबनबी आझाद, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ.नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. वजाहद मिर्झा, महाराष्ट्र प्रभारी मलिकार्जुन खर्गे, यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. पुंजांनी यांच्या काॅंग्रेस प्रवेशाने पक्षाला नवसंजीवनी मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे. सन २०१९ ची विधानसभा निवडणुक जाहीर होताच काॅंग्रेस पक्षाला गळती लागल्याने कारंजा तालुक्यातील काॅंग्रेसच्या अधिकांश नेत्यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तसेच कारंजा तालुक्यात मागील काही दिवसांपासून काॅंग्रेसची अवस्था अतिशय बिकट झाली होती. अशातच बहुजन नेते पुंजांनी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने काॅंग्रेसला चांगले दिवस येतील यात शंका नाही. नव्यानेच राजकारणात काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या पुंजांनी यांनी कारंजा तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात भारीप बहुजन महासंघाच्या कार्याचे जाळे विणून पक्षसंघटन मजबुत केले. त्यांनी आपल्या स्वःकर्तुत्वाच्या जोरावर सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कारंजा मानोरा मतदारसंघात चांगले मताधिक्य घेऊन दुसरा क्रमांक राखला. यंदाच्या निवडणुकीत मात्र वंचित आघाडीकडून त्यांना उमेदवारी न मिळयाने बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणुक लढवून कारंजा मानोरा मतदारसंघात ४२ हजार मताधिक्य संपादन केले. यावरून युसुफ पुंजांनी यांची ताकद दिसून येते. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने कारंजा तालुक्यात काॅंग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर होण्यास मदत होईल.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

भारतीय खेळ पुरस्काराने गजानन चव्हाण सन्मानित


महादेव गित्ते 
--------------------------------------
 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
भारतीय क्रीडा व युवक सेवा संचलनालय न्यू दिल्ली , भारत सरकार न्यू दिल्ली सलग्नित गौरव अवॉर्ड फौंडेशन न्यु दिल्लीत आयोजित भारतीय खेळ पुरस्कार 2019.भारतीय संविधान क्लब येथे आयोजित भारतीय खेल पुरस्कार सम्मान समारोह २०१९ दिनांक  २०/१०/२०१९ रोजी भारतीय संविधान क्लब , मार्ग , नवी दिल्ली येथे सम्पन्न झाला पुरस्कार समारोहासाठी मुख्य अतिथी म्हणून भारतीय ऑलिम्पिक संघाचे उपाध्यक्ष श्री कुलदीप वत्स हे उपस्तिथ होते 
या पुरस्कारासाठी महाराष्ट्र मधून गजानन चव्हाण याना सन्मानित करण्यात आले . विविध खेळामध्ये नैपुण्य असलेले व खेळांचं प्रचार आणि प्रसार तसेच युवा खेळाडू बनविण्यात त्यांचं सहकार्य , त्याच बरोबर अहोरात्र खेळासाठी तळमळ करणारे , विविध खेळामध्ये त्याने आपले विद्यार्धी घडविलेले आहे .एवढं करून त्यानी आपल स्वतःला बनविण्यात सुद्धा वेळ देतात . तसेच गजानन चव्हाण यांनी राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आपल्या देशाचे नाव उज्वल केल्याबद्दल त्यांच्या या कार्यासाठी भारतीय खेळ पुरस्कार समिती दिल्ली द्वारे या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली व त्यांचा गुणगौरव करण्यात आला . 
  या पुरस्कारांमध्ये विजेताना  अर्जुन अवॉर्ड , ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्ती पट्टू श्री वीरेंदर सिंग यांच्या हस्ते  प्रशस्तीपत्र , ट्रॉफी , स्कॉलरशिप देऊन सन्मानित करण्यात आले . पुरस्कार समारोहासाठी मुख्य अतिथी म्हणून भारतीय ऑलिम्पिक संघाचे उपाध्यक्ष श्री कुलदीप वत्स  तसेच भारत गौरव अवॉर्ड फौंडेशन चे महासचिव श्री भारत गौरव संदेश यादव( रेल मंत्री दिल्ली )  तसेच विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय मंत्री व मीडिया प्रभारी पूजा मिश्रा , भारतीय दूरसंचार मंत्रालयाचे सदस्य श्रीमती पायल यादव , श्री  खुसबीर कौर ( डी . एस, पी , अमृतसर अर्जुन अवॉर्ड ), श्री सुनील सिंह ( रणजी ट्रॉफी प्लेअर ) यांची  उपस्तीथी लाभली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वीरेंदर सिग कुस्ती पट्टू ( ऑलिम्पिक मेडलिस्ट , अर्जुन अवॉर्ड विजेते )हे होते या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गजानन चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील सोमेश्वर विद्यालयाचे सचिव रवि बंकटराव कांदे यांनी अभिनंदन केले आहे.

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचा आदेश नसतानाही सुरू केली वैद्यनाथ कारखान्याची बदनामी ; विरोधकांचा पुन्हा खोटारडेपणा! पंकजाताई मुंडे आणि कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र!परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
       भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्याबाबत संबंधित कार्यालयाने कोणतेही आदेश दिलेले नसताना विरोधकांनी पुन्हा खोटारडेपणाचा कळस गाठत वैद्यनाथ कारखान्याची बदनामी सुरू केली  आहे. साखर कारखानदारी अडचणीत असतानाही कारखान्याने कर्मचाऱ्यांची थकीत पगार एकरक्कमी दिल्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाचे  कौतुक केले आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्याबाबत कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे या अनुकूल असुन ३० नोव्हेंबर पुर्वी रक्कम भरणार असल्याचे अगोदरच त्यांनी सांगितले आहे. असे असताना विरोधकांकडून पुन्हा  दिशाभूल करणा-या बातम्या पेरल्या जात असल्याबद्दल सर्वत्र  नाराजी होत आहे.

   वैद्यनाथ कारखाना कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम २४ तासांच्या आत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावी असे आदेश भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने दिल्याचे सांगणारी खोटी बातमी विरोधकांच्या गोटातून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.  वास्तविक ती बातमी पुर्णत: चुकीची आणि वैद्यनाथ कारखाना व अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांची बदनामी करणारी आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ३० आॅक्टोबर रोजी सुनावणी झाली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांनी कारखान्याची भूमिका मांडली. गेल्या काही वर्षांपासून सतत दुष्काळ असल्याने सर्वच साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. वैद्यनाथच्या परिसरातील अनेक कारखान्यांच्या पगारी सहा ते आठ महिन्यांपासून झालेल्या नाहीत. असे असतानाही वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी कर्मचार्‍यांच्या थकीत पगार एकरक्कमी अदा केला आहे. भविष्य निर्वाह निधीची रक्कमही येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत भरणा करणार असल्याचे पुर्वीच सांगितले असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे आयुक्त यांनी आर्थिक अडचण असुनही सर्व पगार अदा केल्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाचे कौतुक करून तक्रारदारास समज दिली, याबाबत पुढील सुनावणी १४ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे सांगून संस्थेला रक्कम भरण्यासाठी वेळ द्यावी असेही ते म्हणाले, मात्र कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी आम्ही तातडीने काही रक्कम भरणा करणार सर्व रक्कम ही ३० नोव्हेंबरपर्यंत भरणा करणार असल्याचे सांगितले आहे. 
       पंकजाताई मुंडे यांनी कर्मचाऱ्यांना एकरक्कमी पगार दिल्याने सर्वांची दिवाळी आनंदात गेली असतानाही केवळ बदनामीसाठी चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत.

मो.यूसुफ पुंजानी यांचा काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश मुंबईत काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेतला प्रवेश
लचंद भगत
कारंजा- तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात भारीप बहुजन महासंघाचा दबदबा निर्माण करणारे तसेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर कारंजा मानोरा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे बहुजनाचे नेते हाजी मो. युसुफ पुंजांनी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर काॅंग्रेसपक्षात प्रवेश केला. ३१ आॅक्टोंबर रोजी मुंबई येथील काॅंग्रेस कार्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.   

यावेळी काॅंग्रेसचे वरिष्ठ नेेते गुलाबनबी आझाद, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ.नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. वजाहद मिर्झा, महाराष्ट्र प्रभारी मलिकार्जुन खर्गे, यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. पुंजांनी यांच्या काॅंग्रेस प्रवेशाने पक्षाला नवसंजीवनी मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे. सन २०१९ ची विधानसभा निवडणुक जाहीर होताच काॅंग्रेस पक्षाला गळती लागल्याने कारंजा तालुक्यातील काॅंग्रेसच्या अधिकांश नेत्यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तसेच कारंजा तालुक्यात मागील काही दिवसांपासून काॅंग्रेसची अवस्था अतिशय बिकट झाली होती. अशातच बहुजन नेते पुंजांनी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने काॅंग्रेसला चांगले दिवस येतील यात शंका नाही. नव्यानेच राजकारणात काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या पुंजांनी यांनी कारंजा तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात भारीप बहुजन महासंघाच्या कार्याचे जाळे विणून पक्षसंघटन मजबुत केले. त्यांनी आपल्या स्वःकर्तुत्वाच्या जोरावर सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कारंजा मानोरा मतदारसंघात चांगले मताधिक्य घेऊन दुसरा क्रमांक राखला. यंदाच्या निवडणुकीत मात्र वंचित आघाडीकडून त्यांना उमेदवारी न मिळयाने बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणुक लढवून कारंजा मानोरा मतदारसंघात ४२ हजार मताधिक्य संपादन केले. यावरून युसुफ पुंजांनी यांची ताकद दिसून येते. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने कारंजा तालुक्यात काॅंग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर होण्यास मदत होईल.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

ना.पंकजाताई मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्याला भविष्य निधी कार्यालयाचा दणका ; कर्मचाऱ्यांचे रखडलेले भविष्य निर्वाह निधी तात्काळ खात्यात जमा करण्याचे आदेश!

,औरं

गाबाद (प्रतिनिधी) :- माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी वै. येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला शासनाच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कर्मचाऱ्यांचे दीड वर्षापेक्षा अधिक काळाचे रखडलेले भविष्य निर्वाह निधीपैकी अर्धी रक्कम २४ तासांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात भरण्याचे आदेश दिले आहेत.

कारखाना प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी कपात केले परंतु ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यात भरले नाहीत, म्हणून कर्मचारी श्री. राठोड यांनी पीएफ कमिशनर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर बुधवारी (दि. ३० ऑक्टोबर, २०१९) रोजी पीएफ कमिशनर औरंगाबाद यांनी सुनावणी करत वरील आदेश दिला. यावेळी तक्रारकर्ते श्री. राठोड यांच्या वतीने ऍड. कवडे यांनी काम पाहिले तर कारखाना प्रशासनाच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्टर दीक्षित हजर होते. 

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ कारखान्याचा संबंध आशिया खंडात नावलौकिक होता, परंतु गेल्या 4-5 वर्षात कारखाना सतत नुकसानीत असून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना कर्जबाजारी झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन व भविष्य निर्वाह निधी रखडलेले होते. फक्त पी. एफ. ची रक्कम तबबल 2 कोटी 94 लाख रुपये इतकी आहे. अनेक वेळा विनंत्या करूनही वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसत ऐन निवडणुकीत पंकजाताईना चांगलेच अडचणीत आणले होते. 

दरम्यान पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेवरून कारखाना प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांचे वेतन जिल्हा बँकेकडून कर्ज घेत अदा केले मात्र भविष्य निर्वाह निधीबाबत शासनाला विनंती करत 30 नोव्हेम्बर पर्यंत मुदत मागितली होती. 

परंतु कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे आयुक्त (पीएफ कमिशनर) यांनी यावर बुधवारी (दि. 30) सुनावणी करत २४ तासाच्या आत रखडलेल्या निधींपैकी अर्धी रक्कम कारखान्याने भरावी तरच मुदतवाढी बाबत विचार करू, असा आदेश कारखाना प्रशासनाला दिला आहे. तसेच कारखान्याने आज (दि. ३१) रोजी पर्यंत अर्धी रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये जमा केल्यास पुढील मुदतवाढी संबंधीची सुनावणी दि. १४ नोव्हेम्बर रोजी घेणार असल्याचेही आपल्या आदेशात म्हटले आहे.

कारखान्याने न्याय दिलाच नाही

कारखान्यासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हक्काचे वेतन आणि पीएफ मिळावे यासाठी कर्मचार्‍यांनी अनेक दिवस कुटुंबासमावेत उपोषण केले मात्र या उपोषणाची साधी दखल घेण्याचे सौजन्य कारखाना प्रशासनाने दाखवले नाही. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपोषणार्थीना भेटून दिलासा दिला तसेच प्रशासन दाद देत नसल्याने  भविष्य निधी कार्यालयाकडे तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन आणि सहाय्य  केल्याने कर्मचा-यांना न्याय मिळाला आहे.

दामाजी आप्पा यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
आरूणा शर्मा
पालम तालुक्यातील आरखेड येथील श्री संत दामाजी आप्पा यांच्या पालखीचे 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पंढरपूर कडे प्रयाण झाले आहे ढोल-ताशाच्या गजरात ग्रामस्थांनी पंढरपूर कडे पालखी मार्गस्थ केली आहे तालुक्यातील आरखेड येथील संत दामाजी यांची पालखी दरवर्षी आरखेड ते पंढरपूर पायी दिंडी जाते यावर्षी दिवाळी संपताच पंढरपूरकडे पायी दिंडी मार्गस्थ झालेली आहे पंढरपुरात आठ दिवसात पालखी पोहोचणार असून विठोबा संस्थानाच्या 65 एकर मध्ये पालखी मुक्कामी राहणार आहे तसेच या ठिकाणी आठ दिवसात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे भाविक भक्तांनी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळी  यांनी केली आहे

शरदचंद्रजी पवार, धनंजय मुंडे करणार पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी
मुंबई (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची येत्या बुधवारी पाहणी करणार आहेत. 

यावर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील  शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

 शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना धीर देण्यासाठी स्वतः पवार साहेब हे येत्या बुधवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत . आपल्या या दौर्‍यात  श्री पवार हे परभणी,  हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  त्यांच्यासोबत या दौर्‍यात असणार आहेत. 

 बुधवार दिनांक 6 रोजी  दुपारी बारा वाजता ते सर्वप्रथम सेलू व परिसरातील नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर परभणी व परिसरातील व त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

हेरगिरी थांबवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे राज्यपालांना पत्र; फेसबुक-व्हॉट्‌स्‌ॲपच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात सुरु असलेली हेरगिरी गंभीर व निषेधार्हमुंबई (प्रतिनिधी) :- 'फेसबुक' मालकीच्या ‘व्हॉटस्अॅप’ या मेसेंजिंग अॅपच्या माध्यमातून देशातील पत्रकार, मानवी हक्क चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात सुरु असलेली हेरगिरी निषेधार्ह, संतापजनक असल्याचे सांगून अशी हेरगिरी बंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करुन संबंधीत प्रकारातील दोषींना कठोर शासन करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

            धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात राज्यपाल महोदयांना पत्र लिहिले असून, त्या पत्रात श्री. मुंडे म्हणतात की, ‘व्हॉटस्अॅप’च्या माध्यमातून देशातील जनतेच्या, पत्रकारांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडून त्यातील फोटो, व्हिडीओ, ऑडीओ संवादासारखी वैयक्तिक, खाजगी स्वरुपाची सगळीच माहिती काढून घेतली जात असल्याचे उघड झाले आहे. देशातील लोकसभा निवडणुकीच्या काळात 20 एप्रिल ते 10 मे या कालावधीत एका विशिष्ट संस्थेने मोठ्या प्रमाणात माहितीची हेरगिरी केल्याचे व त्याबद्दल  अमेरिकेतील  एका  न्यायालयात  खटला  दाखल  झाल्याचे  वृत्त  एका  आघाडीच्या दैनिकाने प्रसिद्ध केल्याकडे श्री. मुंडे यांनी राज्यपालाचे लक्ष वेधले आहे.

‘व्हॉटस्अॅप’च्या हेरगिरीमागे शासकीय व्यवस्थेतील संस्थांचा सहभाग असण्याची शक्यताही श्री. मुंडे यांनी व्यक्त केली.  देशातील शासकीय यंत्रणांनी यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये अशा पद्धतीने नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात घुसखोरी, हेरगिरी केल्याचे वारंवार समोर आले आहे. हे निषेधार्ह, संतापजनक आहे, असेही श्री. मुंडे म्हणाले.

देशातील नागरिकांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडणे, त्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात डोकावणे व तेथून त्यांच्या व्यक्तिगत, खाजगी, संवेदनशील माहितीची चोरी करणे हा गंभीर अपराध आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात डोकावण्याचा प्रकार गंभीर असून यातून प्रचंड जनक्षोभ उसळण्याची भीती नाकारता येत नाही, अशी भीतीही श्री. धनंजय मुंडे यांनी राज्यपाल महोदयांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

50 व्या इफ्फीमध्ये आशियाई चित्रपटांवर भर देशांच्या 200 उत्तम चित्रपटांचा समावेश
मुंबई (प्रतिनिधी) :- 2019 मध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचे 50 वे वर्ष असून आशिया खंडातला हा एक प्रतिष्ठेचा चित्रपट महोत्सव आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इफ्फीमध्ये आशियाई देशात ठसा उमटवणाऱ्या काही नव्या आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा विशेष विभाग राहणार असून ‘सोल ऑफ इंडिया’ म्हणजे आशियाचा आत्मा असे या विभागाचे नाव राहणार आहे.


या विभागात ‘फिलिंग्ज टु टेल’ हा बेन ली यांचा चिनी चित्रपट, सन चाओ यांचा समर इज द कोल्डेस्ट सिझन चींग चोंग आणि बो झांग यांनी सहदिग्दर्शित केलेला द फोर्थ वॉल, टेन इयर्स जपान हा जपानी चित्रपट, टेन इयर्स तैवान हा तैवानी चित्रपट, श्रीलंकेच्या ललिथ रत्नायके यांनी दिग्दर्शिक केलेला द अदर हाफ, सिंगापूर आणि तैवान सहनिर्मित आणि वेट सिझन या चित्रपटांचा समावेश आहे.

टेन इयर्स जपान आणि टेन इयर्स तैवान हा सर्वोपयोगी चित्रपट जो 2015 मध्ये 10 वर्षांच्या श्रृंखलेने सुरू होतो. या देशातल्या युवा दिग्दर्शकांनी दशकभरातल्या भोवतालच्या घडामोडीची केलेली कल्पना आणि आगामी काळातली संकटाचे केलेले अद्‌भूत चित्रण या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

हे चित्रपट आशियाई देशात चित्रपट निर्मिती क्षेत्रातले धाडसी आणि चैतन्यदायी प्रयत्नांची अनुभूती देतात. चित्रपट आणि जगभरातले प्रेक्षक यांच्यातला सेतू म्हणून काम करणाऱ्या या चित्रपट निर्मात्यांचा या मंचावर 50 व्या इफ्फीमध्ये गौरव करण्यात येणार आहे.

50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 76 देशातले 200 उत्तम चित्रपट, इंडियन पॅनोरमामध्ये 26 चित्रपट, 15 कथाबाह्य चित्रपटांचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. सुमारे 10 हजार चित्रपट रसिक या सुवर्ण महोत्सवी इफ्फीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

इफ्फीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने 2019 मध्ये 50 वर्ष पूर्ण होत असलेले विविध भाषांतले 12 महत्वपूर्ण चित्रपट, 20 ते 28 नोव्हेंबर या काळात दाखवण्यात येणार आहेत.

परतीच्या पावसाने परळी विधानसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट मदत द्या- राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
परळी विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेले पिक हातचे गेले आहे.परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या दिवाळीवर नुकसानीचे सावट होते.आज शेतकरी पुर्णतः हवालदिल झाला असून तात्काळ पिकांचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी,कृषि अधिकारी यांना गुरूवार,दि.31 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.


परळी विधानसभा मतदारसंघाचे आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळी विधानसभा अध्यक्ष तथा अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख,माजी आ. पृथ्वीराज साठे,जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ दौंड,जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सिरसाट,ज्येष्ठ नेते दत्तात्रय पाटील,नगरसेवक बबनराव लोमटे,अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती मिनाताई भताने,हणमंतराव मोरे,रणजित लोमटे,अजितदादा देशमुख, गणेश देशमुख,दामोदर कदम, कैलास गायकवाड,ज्ञानोबाराव जाधव,विलासबापु मोरे,सुधाकर शिनगारे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी,कृषि अधिकारी यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,परळी विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांशी गावांना परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे.आजही परतीचा पाऊस थांबायला तयार नाही. शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले सोयाबीन पिक,कापुस,ज्वारी,मका,तुर आदी पिके हातची गेली आहेत. या पिकांमुळे शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे.आणि त्यातच राज्याच्या कृषी विभागाने व विमा कंपन्यांनी नाहक व डोकेदुखी वाढविण्याचे नियम काढले आहेत.ज्याचा परिणाम शेतक-यांच्या मानसिकतेवर होत आहे.तेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देवून स्पष्ट केले आहे.की झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग व महसुल विभागाला सुचना देवून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पिक विमा मंजुर करावा व तसे आदेश विमा कंपन्यांना देण्यात यावेत शासनाने एकरी पंधरा हजार रूपये तातडीने मदत द्यावी असा अहवाल पुनर्वसन खात्याकडे पाठवावा,सन 2018-19 मधील खरीप व रब्बी पिकांचा विमा ज्या शेतकर्यांना मिळाला नाही. तो ताबडतोब वाटप करण्यात यावा,शेतकर्यांच्या शेतीमधील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करावा,अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे,पावसाळ्याच्या सुरूवातीच्या काळात अत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतक-यांनी पेरण्या करूनही पिके आलेली नाहीत.त्यांचा अहवाल शासनाकडे व विमा कंपनीकडे तात्काळ पाठवावा अशा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.येत्या 10 नोव्हेंबर पर्यंत मागण्यांची पुर्तता करण्यात यावी.अन्यथा शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर वसंतराव कदम,सरपंच सुधाकर शिनगारे, सरपंच बाबासाहेब सोनवणे, गौतम चाटे,आबासाहेब पांडे, वामन जाधव,ओबीसी सेलचे धनंजय शिंदे,अविनाश उगले, कल्याण उदार,गोविंद आरसुडे, हरिभाऊ कांबळे,अतहर जहागीरदार,वहिद खाँ पठाण, गणेश जाधव,पंडीतराव किर्दंत, ताराचंद शिंदे,रमेश पवार,किरण साळुंके,नरसिंग निकम,शेख मन्सुर,ज्ञानोबा गर्जे,व्यंकट गर्जे, गोपाळ सोमासे,बाबासाहेब कदम,बालासाहेब जाधव,सरपंच ज्ञानोबा जाधव,वसंत उदार, अजित गरड,श्रीमंत क्षीरसागर, गणेश भगत,विलास धावडे, गोपाळ सोमासे,ईश्‍वर शिंदे, चंद्रकांत वाकडे,बालासाहेब जाधव,बाबासाहेब किर्दंत,गणेश जाधव,शरद गंगणे,हरिश्‍चंद्र वाकडे,दगडु पटेल,अरूण शिनगारे,खिलापत अली, फत्ताउल्ला हाश्मी,माऊली औताडे,नवनाथ घाडगे,गौस हाश्मी,तात्याराव औताडे,गणपत भगत,श्रीपती औताडे,ताराचंद शिंदे,रामलिंग चव्हाण,सुंदर शिंदे,धर्मराज धुमाळ यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी

परळी विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकर्‍यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे.या शेतकर्‍यांना तात्काळ शासनाच्या वतीने मदत द्यावी, खरीप व रब्बी पिक विमा द्यावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे,प्रशासनाने या बाबत तातडीने कार्यवाही करावी. -गोविंदराव देशमुख (उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई.)


परतीच्या पावसाने परळी मतदार संघात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

यावर्षी पावसाळा 

ओल्या दुष्काळात कोरडी सहानूभूती नको. .! शासनाने शेतकर्‍यासाठी ठोस ऊपाययोजना करन्याची गरज


मंगरूळपीर-परतिच्या पावसाने धुमाकुळ घालुन हाताशी आलेला शेतकर्‍यांचा घास हिरावून नेल्याने आणी या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने स्पाॅट पंचनामे करुन तात्काळ मदत जाहीर करावी अशी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली असुन ओल्या दुष्काळात कोरडी सहानुभुती नको अशी संवेदनशिल हाक प्रशासनाला दिली आहे.
           महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला नाही.तर यावर्षी पावसाळा सुरूच राहीला.पाऊस थांबणार कधी असा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकºयांना पडला.वाशिम जिल्ह्यातील  शेतकरी हवालदिल झाला आहे.सोयाबिनसह अन्य पिकांचेही  मोठे नुकसान जिल्ह्यात झाले आहे.हाता तोडांशी आलेला घास हिरावून न्यावा तशीच काहीशी अवस्था या शेतकºयांची झाली आहे. ज्या भागात जमीनीत पाण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणच्या पिकाने केव्हाचीच मान टाकली.मंगरुळपीर तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या शेतात सोयाबिनला कोंब आले. यामुळे तयार झालेले पिक घरा पर्यंत पोहचणे मुश्किल झाले आहे.२४ तारीखला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.सोयाबिनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या आणि शेतकºयांचा हा जीवन मरणाचा विषय ऐरणीवर आला. काही लोकप्रतीनिधींनी याही स्थितीत शेतकºयांसोबत उभे राहून फोटो काढून घेण्यात आले. नुकसानीच्या दु:खाचा डोंगर डोक्यावर घेऊन वावरणारा शेतकरी फक्त त्याला झालेल्या नुकसानीची मोठ्या प्रमाणावर भरपाई मिळावी अशी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.जिल्ह्यातील शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्रातील कोणतेही आणि कुणाचेही सरकार असले तरीही उर्वरित महाराष्ट्रातील राजकीय नेते कधीही वाशिम जिल्ह्यातील शेतकºयाच्या बाबतीत कधीही सकारात्मक विचार करण्याची शक्यता नाही. शेतकºयांना  राज्य सरकार मदत देईल असे जाहीर केले आहे. परंतू गेल्या पाच वर्षांतील हजारो कोटी जाहीर केले. खरोखरच जमा रक्कम काही नाही. पाच वर्षांतील दिले कोणी आणि घेतले कोणी असाच हा सारा व्यवहार राहिला आहे.मंगरुळपीर तालुक्यातील शेतकºयांचे जे नुकसान झाले आहे.त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून तालुक्यातील शेतकरी संघटीतरित्या काहीही करणार नाही. विविध राजकीय विचारसरणी मध्ये शेतकरीही विखुरला आहे.शेतकºयांच्या प्रश्नासाठी सर्व सामान्य शेतकरीच पुढे राहीला पाहिजे.काहीभागातील  शेतकरी एकवटला आणि त्यानी प्रयत्न करायला सुरुवातही केली आहे.शेतकर्‍यांनी सबंधित प्रशासनाला नुकसान  झाले आहे याविषयी आपले गार्‍हाने मांडले. या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंञ्यांनी नुकसानीचे स्पाॅट पंचनामे करन्याचे आदेश दिले. त्यानंतरच प्रशासन हलले.
मात्र शेतकºयांचे जे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाले पाहिजेत.शासकीय अधिकारी जर आॅफीसमध्ये बसून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले तर भरपाई कशी काय मिळू शकेल. असा प्रश्न च शेतकºयांना पडला आहे. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकºयांची मागणी आहे. शेतकºयाच्या या मागणीला राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली तर  शेतकºयांना थोडा तरी आधार वाटेल.शैतकरी यावर्षी शेतात साचलेले पाणी पाहून हतबल झाला असुन. शेतकºयांच्या डोळ्यातील पाण्याने निसर्गही वेदनेने व्याकूळ झाला असेल. ओल्या दुष्काळात राजकीय पुढाºयांची कोरडी सहानूभूती नको अशी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी भावनिक साद प्रशासनाला घालुन शासकीय भरीव आर्थिक मदत हवी अशी मागणी आता शेतकर्‍यांमधुनही जोर धरत आहे.

लग्नापूर्वीच " बाप " बनलेले क्रिकेटपटू


 लग्न हे भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र धर्मकार्य मानलं जातं. लग्नापूर्वी स्त्री पुरुष लैंगिक संबंध भारतीय संस्कृतीत व्याभीचार या प्रकारात मोडले जाते. तसे बघाल तर दोन अविवाहीत स्त्री पुरुषांमध्ये प्रेम प्रकरणं सर्वत्र
सर्रास चालतात. अगदी भारतातही परंतु लग्नापूर्वीच मुलबाळ होणं भारतात तरी पाप मानले जाते. त्यामुळे कितीही उडानटप्पू असलेला भारतीय या चुकीच्या फंदात पडत नाही. परंतु पाश्चात देशात व पाश्चात संस्कृतीचा अंगीकार केलेल्या इतर देशातील लोकांनी या अभद्र संस्कृतीला मोठया प्रमाणावर खतपाणी घातले आहे. त्यामुळे " लिव्ह इन " संस्कृतीत अशा प्रेमवीर जोड्या एकत्र राहून "मुल" जन्माला घालतात. काही प्रामाणिक लोक खऱ्या प्रेमामुळे पुढे त्या स्त्रीशी विवाह करून संसार थाटतात. तर काही जण "चैन " करून सदर स्त्रीला सोडून देतात. हा निव्वळ धोका आहे. परंतु काही क्रिकेटपटू असे आहेत की त्यांनी अविवाहीत असताना स्त्रीशी संबंध ठेवले. मुलही होऊ दिले व त्या स्त्रीशी लग्नही केले. तर काहींनी स्पष्ट नकारही दिला.                                                                                              सन १९८० ते ९० च्या दशकात विंडीजचा सुपरस्टार क्रिकेटपटू की, जो " किंग रिचर्डस " या नावाने ओळखला जायचा. त्याच्या संमिश्र फलंदाजीमुळे त्याने स्वतःचे अनेक चाहते निर्माण केले. आपल्या बहारदार खेळाने अनेक विक्रम स्थापित केले. विंडिजला दोन वेळा विश्वविजेते बनविले. इतकेच नाही तर विंडीज क्रिकेटचा सर्वत्र दरारा निर्माण करण्यात अग्रेसरही होता. टिपीकल विंडीज लुक असलेला विव्हीयन रिचर्डस आपल्या आकर्षक शैलीमुळे सर्वांच्या गळ्यातील तावीत बनला होता. सन १९८० मध्ये भारत दौऱ्यावर असताना प्रसिद्ध बॉलीवूड सिनेतारका नीना गुप्ताशी त्याची भेट झाली. या ओळखीचे प्रेमात व प्रेमाचे एकत्र राहण्यात  (ज्याला " लिव्ह इन " हे गोंडस नाव आहे ) सुरुवात झाली. त्यांच्या याच विवाहबाहय संबंधातून मसाबा नावाची मुलगी झाली.आजच्या घडीला हिच मसाबा रिचर्डस बॉलीवुड मधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.  रिचर्डसचं पुर्वी लग्न झालेले होते.पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुलेही आहेत.                                                       आपलं राजबिंडं व्यक्तिमत्व, अष्टपैलू, भारदस्त राहणीमान व सर्वांना आकर्षित करणारं नेतृत्व या मुळे पाकचा विद्यमान पंतप्रधान इम्रान खान नियाझी सर्वत्र परिचीत होता. याच बरोबर त्याचा ऐषोआरामी व रंगीला स्वभाव सर्वांच्या नजरेत भरायचा. आपल्या आयुष्यात विश्वविजयी कर्णधार ते एका देशाचा पंतप्रधान या सर्वोच्य पदापर्यंत पोहोचणारा इम्रान मात्र त्याच्या वैवाहिक जिवनात कधीही यशस्वी झाला नाही. तीन अधिकृत लग्न केली ते शेवटपर्यंत टिकले नाही.जेमीमा गोल्ड स्मिथ या ब्रिटीश महिलेशी पहिले लग्न करण्यापूर्वी सिता व्हाईट या ब्रिटीश ललनेशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. सन १९८७ - ८८ मध्ये त्यांची प्रथम भेट झाली. १९९१ मध्ये त्यांची जवळीक आली. १९९२ मध्ये त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांतून मुलीचा जन्म झाला. तायरीयन हे त्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं. इमरानने त्या मुलीला स्वतःचं नाव दिलं नाही. परंतु सिताचा मृत्यू व  वैद्यकीय चाचण्यांमध्ये तायरीयन इम्रानचीच संतान असल्याचं सिद्ध झाल्याने त्याला तिचा सांभाळ भाग      पडलं.                      

                        बॉल टॅम्परींग प्रकरणात सजा भोगून संघात परतलेला माजी ऑस्ट्रेलियन उपकर्णधार डेव्हीड वॉर्नर आपल्या खेळाचा खेळ करण्याच्या वृत्तीने सर्वत्र परिचित आहे. सन २०१४ मध्ये पाश्चात संस्कृतीत प्रचलीत असलेल्या लिव्ह इन पद्धतीनुसार आपली गर्लफ्रेंड कँडीस फॅल्जन हिला वॉर्नरच्या माध्यमातून मुलगी झाली. तिचे  आयवी मे असे नामकरण करण्यात आले. पुढे चालून सन २०१५ मध्ये दोघे रितसर विवाहबध्द झाले. त्यानंतर त्यांना आणखी एक मुलगी झाली. तिचे नाव इंडी रे असे ठेवण्यात आले.                                  

                    आपल्या आक्रमक व रंगील्या स्वभावाचा धडाकेबाज  कॅरेबीयन फलंदाज ख्रिस गेलही या अनोख्या क्लबमध्ये समाविष्ठ आहे. सन २०१६ च्या आयपीएल स्पर्धेदरम्यान विंडीजमध्ये त्याची मैत्रीण नताशा बॅरीज हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही स्पर्धा सुरू असताना गेल विंडीजला जाऊन परत खेळायला आला. ब्लश हे मुलीला नाव त्यानेच दिले.                                                                                  सन २०१४ मध्ये मैत्री सुरू झालेल्या कॅरी कोटरेल हिच्या सोबतच्या प्रेम प्रकरणातून इंग्लंडचा विद्यमान कसोटी  कर्णधार ज्यो रुट ही लग्नापूर्वीच पिता बनला.मार्च  २०१६ मध्ये दोघांनी साखरपुडाही केला सन २०१७ मध्

सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येते शेतकऱ्याकडून काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)

सेनगाव/प्रतिनिधी:-  सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बांधावर काळे झेंडे दाखवून प्रशासणाचा तीव्र शब्दात निषेध केला. 
       मागील १० ते १५ दिवसापासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे यामध्ये शेतालमधील सोयाबीन,तूर,कापूस,झेंडू या पिकांचे खूप नुकसान झाले असतांना प्रशासनाने पंचनामे करण्यास विलंब लावत असल्याने येथील शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. ताकतोडा येथे ९०० हेक्टर जमीन असतांना येथे ताकतोडा सर्वे करण्यासाठी फक्त ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वे कसा होईल असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
        यावेळी हेक्टरी ५०००० रुपये शासनाने सरसगट मदत जाहीर करावी.एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतांना नेतेमंडळी मुख्यमंत्री पदासाठी भांडत असल्याने याचाही तीव्र शब्दात निषेध केला. तसेच आमदार खासदार फक्त बांधावर उभे राहून फोटो बाजी करत असल्याचा आरोप येथील उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी नामदेव पतंगे,दशरथ सावके,कैलास सावके,राजू नवघरे,मंचकराव देशमुख,रमेश नवघरे,शंकर कोरडे,त्र्यंबक कोरडे,बबन उजळे व इत्यादी शेतकरी उपक्षित होते.

पाथरीत शासकीय मुग खरेदीला प्रारंभ
प्रतिनिधी
पाथरी:- शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरात हमी भाव याेजने अंतर्गत  पीएसएस२०१९-२० सपाेर्ट फार्मर्स प्राेड्यूसर कंपनी लिमिटेड पाथरीच्या वतीने गुरूवार ३१ ऑगष्ट पासून शासकीय दराने ऑनलाईन पद्धतीने नाेंदनी केलेल्या मुग उत्पादक शेतक-यांच्या मालाच्या खरेदीचा प्रारंभ शेतकरी प्रल्हाद धर्मे आणि जन्मभूमी फाऊंडेशनचे सदस्य सय्यद गुलशेरखान मामा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या वेळी सपाेर्ट फार्मर्स प्राेड्यूसर कंपनीचे अध्यक्ष सदाशिव थाेरात, पं स सदस्य अजय थाेरे, माऊली गिराम,जन्मभूमी फाऊंडेशनचे सचिव किरण घुंबरे पाटील यांची या वेळी उपस्थिती हाेती.एक महिण्या पुर्वी पासून शेतक-यांनी मुगाची ऑनलाईन नाेंदनी केली हाेती.सतत पाऊस पडत असल्याने शेतक-यांचे नुकसान हाेऊ नये म्हणून मुगाची खरेदी थाेड्याशा विलंबाने करत असल्याचे थाेरात यांनी या वेळी बाेलतांना सांगून मुगात १२ टक्केच आेल असावी मुग केंद्रावर आणण्या पुर्वी उनात चांगले वाळवावे सर्व मुग आणण्या पेक्षा मुगाचा दाेनचार किलाे नमुना अनावा ज्या मुळे शेतक-यांची चक्कर हाेऊन अनावश्यक खर्च टाळता येईल असे ही ते म्हणाले. नाेंदनी केलेल्या सर्व शेतक-यांचा मुग खरेदी करणार असल्याचे ही ते या वेळी म्हणाले. फक्त शासनाचे निकश म्हणजेच मुगात आेलावा हा १२ टक्के असावा असेही ते या वेळी म्हणाले. या वेळी प्रथम मुग विक्री साठी आणलेल्या जगन्नाथ निवृत्ती काळे, चाटे पिंपळगाव, प्रल्हाद बालासाहेब धर्मे लाेणी बु., भगवानराव वडीकर,विष्णू नारायण घुले, डाेगरगाव, विकास बाबासाहे धर्मे, बालासाहेब मदन साैदरे, महादेव आश्राेबा धर्मे, बळीराम फासाटे,डाेंगरगांव, बालासाहेब काळे, महेश काळे पिंपळगाव. येथील शेतक-यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संग्रामपुर कृषि कार्यालयातील एक खिडकी राम भरोसे, कर्मचारी झाले मस्तवाल ! शेतक-याची चेष्ठा


संग्रामपुर [ प्रतिनिधी] परतीच्या पावसामुळे शेतमाल शेतात भिजत असताना शेतकरी अवकाळीमुळे आर्थिक व  मानसिक खचलेला असुन संग्रामपूर येथील एक खिडकी कार्यालय रामभरोसे सुरु आहे  ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे त्याची ऑनलाईन पावती व नुकसानीचा अर्ज संबधित विभागात जमा करावे असे सांगण्यात आले पण त्या कार्यालयात एक दान पेटी साररवा डब्बा ठेवला असुन त्यामध्ये आपआपले अर्ज टाकावे असे सुचना पत्रक डब्यावर लावल्याने कृषि कार्यालयातील कर्मचारी मस्तवाल झाले असल्याची तिव्र प्रतिक्रिया शेतकरी वर्गातुन उमटत असुन अर्ज घेण्यासाठी तसेच शेतकरऱ्यांना व्यवस्थितपणे कोणीही माहीती देण्यासाठी हजर नसल्याने शेतकरी बांधवात तिव्र नाराजी पसरली आहे याचा अर्थ काय समजावा हेच काय ते अच्छे दिन... कृृषि कार्यालयातील कर्मचारी मस्तवाल दिसून येतात. नव्याने सरकार करताना हे तुला ते मला,  मला एवढे तुला तेवढे.. यासाठी साठमारी सुरू आहे. सरकार सत्तेवर असताना ही शेतकरी वर्गासाठी तत्परतेने मदत मिळाली नाही. आतातरी मायबाप शासनाने मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा शेतकरी मधुुन व्यक्त होत आहे 
यावर्षी सुरूवातीला अतिपावसामुळे खरडलेले शेत पुन्हा तयार करून शेतकरी उमेदिने ऊभा राहिला. सर्वेक्षण केले पण मदत देताना शासनाचे करंटेपण दिसत आहे.
 शेतकरी अवकाळीपावसाने मुळे आर्थिक व  मानसिक खचलेला असल्याने व त्यात संग्रामपूर येथील एक खिडकी कार्यालय रामभरोसे झाले आहे कृषि कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मस्तवाल कर्मचारीना समज देतो काय? व कृषिप्रधान देशात शेतकरीची चेष्ठा हि शोकांतीकाच नव्हे का ?

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सह पिकविम्याची रक्कम द्या अभयसिंह मारोडे यांची मांगणी प्रधान सचिवाला निवेदन


संग्रामपुर [ प्रतिनिधी] परतीच्या            अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे तात्काळ सर्वे करून त्यांना प्रशासकीय मदत त्यांच्या खात्यात वर्ग करावी.तसेच पिकविमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा यावेळी पिक नुकसानाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर्षी कुठल्याही अटीविना यावर्षी शेतकऱ्यांना १००% पिकविमा द्यावा अशी मांगणी मंत्रालयात जाऊन महसूल (मदत व पुनर्वसन) या विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांना सामाजीक कार्यकर्ते अभयसिंह मारोडे यांनी निवेदनातुन केली आहे  निर्सगाच्या अकृपेने होतेच नव्हते झाले मुंग उळीद सोयाबीन ज्वारी पिक तोंडातील घास हिसकावुन घेतल्याने व अतिवृष्टीमुळे पांढरे सोने कपाशी पिक धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले हतबल शेत-यांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी शेतक-यावर ओढवलेले संकट परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर विषयाला सकारात्मकता दर्शविली व त्यांच्या विभागाकडून आवश्यक ती मदत करण्याचे चर्चे दरम्यान मंत्रालय प्रधान सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी आश्वासन सामाजीक कार्यकर्ते अभयसिंह मारोडे यांना दिल्याने शेतकरी बांधवाच्या वतीने प्रधान सचिव यांचे आभार मानले प्रशासना कडून शेतकरी बांधवांना  मदत मिळेल यासाठी कायम प्रयत्नरत राहील. शेतकरी बांधव  बऱ्याचअंशी कागदोपत्री लढाईत कमी पडतात म्हणून  शेतकरी बांधवांंच्या  न्याय व हक्कासाठी प्रयत्नरत राहणार असल्यााची प्रतिक्रिया बोलतांना दिली

राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावले बुलडानेकर:• उत्स्फूर्त प्रतिसाद
:जिल्हाधिकारी यांनी दाखविली  एकता दौडला हिरवी झेंडी
बुलडाणा, दि. ३१ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज, ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित ‘रन फॉर युनिटी’मध्ये बुलडाणेकर राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावले. या दौडमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थी, युवक, खेळाडू, अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी, नागरिक या एकता दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  दौडचा शुभारंभ जिजामाता प्रेक्षागार येथून जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील - भुजबळ यांनी हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
   यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे, तालुका क्रीडा अधिकारी श्री. धरपकवार यांच्यासह स्वयंसेवी संस्था, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
 सदर दौड संगम चौक, जयस्तंभ चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बँक चौक मार्गे पुन्हा जिजामाता प्रेक्षागार येथे आल्यानंतर दौडचा समारोप झाला.
विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, पोलीस व होमगार्ड कर्मचारी, पोलीस पाटील, पोलीस मित्र, अधिकारी-कर्मचारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, प्रशिक्षक, खेळाडू व नागरिक या दौडमध्ये सहभागी झाले होते.

जमील पठाण
8805381333

Wednesday, 30 October 2019

शेतकऱ्यांना रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी-प्रविण पट्टेबहादूर


महसूल विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी

रिपाई आठवले गट प्रणित बहुजन विद्यार्थी परिषदची मागणी

फुलचंद भगत
 वाशिम - मागील दहा दिवसापासून जिल्ह्यात प्रथमच सतत पाऊस चालू असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.यावर्षी सारखा पाऊस दिवाळीत कधीच झाला नाही. दिवाळीत पाऊस पडेल याची कधी शंका देखील व्यक्त केली नाही.यावर्षी मात्र शेतकर्यांच्या तोंडी आलेला घास मात्र निसर्गाने हिरावून घेतला आहे.यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे.या शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत करून संकटातून बाहेर काढावे अशी मागणी रिपाई आठवले गटाचे बहुजन विद्यार्थी परिषद वाशिम जिल्हाध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी प्रसिद्धीपत्रकातून जिल्हा प्रशासनाला केली आहे. पुढे बोलतांना प्रविण पट्टेबहादूर म्हणाले की,बळीराजाने आपली संपूर्ण शेतातील कामे ही आटोपून शेतकरी आनंदात दिवाळी सण साजरा करण्यासाठी आतुर होता. मात्र या आनंदावर पावसाने विरजण करून शेतकऱ्याला हवालदिल केले आहे.अजूनही शेतात सोयाबीन पिकांची गंजी लावून आहे,त्याला अति प्रमाणात पाऊस पडल्याने शेवटी कोंब फुटून सोयाबीन पीक धोक्यात आले आहे.असाचपाऊस पडत राहिला तर रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.म्हणून शेतकऱ्यांना आताच महसूल विभागाने सर्वेक्षण करून मदत द्यावी अशी शेतकरी हिताची मागणी रिपाई आठवले गटाचे प्रविण पट्टेबहादूर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

परळी विधानसभेचे नवनिर्वाचित आ.धनंजय मुंडे यांनी केली भाऊबीज साजरी
(प्रतिनिधी) :- विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा परळी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी आज दिवाळी भाऊबीज निमित्त मुंबई येथील आपल्या जेष्ठ भगिनी सौ शकुंतलाताई  केंद्रे यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली.

गेवराई तालुक्यातील शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यूसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३० _ गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांचा दोन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता, त्यामुळे आता या कुटुंबात केवळ दोन महिला राहिल्या आहेत . 
      बीड जिल्ह्यात मागच्या पंधरवड्यात झालेल्या पावसाने सारे शेततळे भरले आहेत. सिरसमार्ग ता. गेवराई येथे ठोंबरे कुटुंबातील विकास (वय २४ ) आणि गणेश (वय २२ ) हे दोघे बुधवारी ( दि. ३० ) शेतात पाहणी करण्यासाठी गेले होते. ते शेततळ्याशेजारी असताना 'विकास' चा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गणेश देखील शेततळ्यात पडला. दोघांचाही शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू झाला . 
           यातील मयत विकास आणि गणेश हे दोघे सख्खे भाऊ होते. त्यांचे वडील सुदाम ठोंबरे यांचा दोन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. यातील विकासाचा काही दिवसांपूर्वी विवाह झाला होता. आता ठोंबरे कुटुंबात मयत विकासची पत्नी आणि आई या दोघीच उरल्या असून घर उघड्यावर पडले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

धीरज कुमार दिवाळीचा सण आपल्या कार्यालयात पूजाने साजरा करतातमुंबई (प्रतिनिधी) :- 
अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांनी आपल्या अंधेरी वेस्ट ऑफिस क्रिएटिव्ह आय लिमिटेड मध्ये दिवाळीचा उत्सव मागील वर्षाप्रमाणे सहकारी व कर्मचारी यांच्यासमवेत दिवाळी पूजेसह साजरा केला.
    गेल्या अनेक वर्षांपासून कार्यालयात लक्ष्मीपूजन साजरे केले जात आहे, शांतता, सौहार्द आणि मानवतेसाठी प्रार्थना करीत आहेत. धीरज कुमार पुढे म्हणाले, लक्ष्मी पूजना नंतर मला खरोखरच नम्र वाटते कारण यामुळे मला मानसिक शांती मिळते आणि माझा आत्मा समाधानी होतो.
     आपल्या व्यावसायिक आघाडीवर धीरज म्हणाले की, सध्या आयएसएचक्यू एएजे काल नावाच्या नवीन वेबसीरीज 3० ऑक्टोबरला झी प्लॅटफॉर्म वरुन हंगाम यशस्वी झाल्यानंतर त्याचा प्रक्षेपण सुरू करतील. क्रिएटिव्ह आय लिमिटेड द्वारा निर्मित ‘आयएसक्यू एएजे का’ची निर्मिती धीरज कुमार, झुबी कोचर आणि सुनील गुप्ता यांनी केली आहे.
      धीरजने दर्शकांना दिव्याची खूप शुभेच्छा दिल्या आणि क्रिएटिव्ह आय लिमिटेडच्या नवीन वेबसिरीज इश्क आज कल आणि पुढील निर्मितीवर आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना केली.

टॅक्सी संवर्गातील वाहनांतून ‘चाईल्ड लॉक्‍’ची सुविधा निष्क्रीय करावी


बुलडाणा, दि. 30 : रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांनी कळविलेल्या पत्रानुसार वाहनांतील ‘चाईल्उ लॉक’ या यंत्रणेच्या अतिरिक्त सुविधेचा विविध गुन्हेगारांकडून गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: ही सुविधा टॅक्सी मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी  धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशी चाईल्ड लॉक यंत्रणा टॅक्सीसह अन्य वाहनांतून निष्क्रीय करण्यात यावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
  - - - - - - - - - (-                                                             
तलाठी पदभरतीच्या निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्रांची होणार तपासणी
खुला, अ.जा, अ.ज, विमुक्त जाती- अ प्रवर्गासाठी 7 नोव्हेंबर रोजी तपासणी
भटक्या जमाती –ड, इमाव, एसईबीसी व ईडब्ल्युएस प्रवर्गासाठी 8 नोव्हेंबर रोजी तपासणी
बुलडाणा, दि. 30 : महापरीक्षा पोर्टलमार्फत 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत तलाठी पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेच्या निकालामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे व त्यांनी ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे प्रारूप निवड अथवा प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर प्रारूप निवड अथवा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे मुळ प्रमाणपत्र तपासणी प्रवर्गनिहाय 7 व 8 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे करण्यात येणार आहे.
  खुला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती –अ प्रवर्गातील निवड अथवा प्रतीक्षा योदीवरील उमेदवारांनी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपस्थित रहावे.    तसेच भटक्या जमाती- ड, इतर मागासवर्ग, एसईबीसी (सोशल ईकॉनॉमीकली बॅकवर्ड क्लास) व ईडब्ल्यूएस (ईकॉनॉमीकली विकर सेक्शन) प्रवर्गातील उमेदवारांनी 8 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपस्थित रहावे.
   येताना उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, वाहन परवाना तसेच ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेली सर्व मुळ प्रमाणपत्रे व या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रतीचा एक संच आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो न चुकता सोबत आणावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        - - - - - - - - - - - 
जलसाठ्यातील पाणी आरक्षणासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी नोंदवावी

31 ऑक्टोंबर रोजी होणार पाणी आरक्षण सभा पुढे ढकलली
बुलडाणा, दि. 30 : जिल्हा पाणी आरक्षण समितीची सभा 31 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. बुलडाणा पाटबंधारे विभागाकडील तलावांवरून पिण्याचे पाणी आरक्षणाची  मागणी नोंदविण्याबाबत सर्व नगर परिषद, गटविकास अधिकारी, संबंधित ग्रामपंचायत यांना कळविण्यात आले होते. मात्र नियमित पाणी वापर करणारे बरेचसे बिगर सिंचन पाणी पुरवठा करणारे योजनांचे बिगर सिंचनाची पाणी आरक्षणाची मागणी अद्याप या विभागास अप्राप्त असल्यामुळे व प्रशासकीय कारणास्तव सदर बैठक पुढे ढकलण्यात येत आहे.
   तरी सर्व संबंधितांनी आपले पाणी मागणी कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांच्याकडे 5 नोव्हेंबर 2019 पूर्वी न चुकता नोंदवावी. अन्यथा बिगर सिंचन पाणी आरक्षणाची मागणीची नोंदणी न झाल्यास किंवा विलंब झाल्यास आपली पाणी आरक्षण होणार नाही. या बाबीस संबंधित स्वत: जबाबदार राहतील. होणाऱ्या सभेमध्ये धरणातील उपलब्ध पाणी साठयानुसार, पिण्याच्या पाण्याचे आरक्षणास मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. याची सर्व संबंधित बिगर सिंचन आरक्षण करणाऱ्या संस्थांनी नोंद घ्यावी, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                          जमील पठाण
8805381333

गेवराई तालुक्यातील शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू

 सु
भाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३० _ गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांचा दोन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता, त्यामुळे आता या कुटुंबात केवळ दोन महिला राहिल्या आहेत . 
      बीड जिल्ह्यात मागच्या पंधरवड्यात झालेल्या पावसाने सारे शेततळे भरले आहेत. सिरसमार्ग ता. गेवराई येथे ठोंबरे कुटुंबातील विकास (वय २४ ) आणि गणेश (वय २२ ) हे दोघे बुधवारी ( दि. ३० ) शेतात पाहणी करण्यासाठी गेले होते. ते शेततळ्याशेजारी असताना 'विकास' चा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गणेश देखील शेततळ्यात पडला. दोघांचाही शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू झाला . 
           यातील मयत विकास आणि गणेश हे दोघे सख्खे भाऊ होते. त्यांचे वडील सुदाम ठोंबरे यांचा दोन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. यातील विकासाचा काही दिवसांपूर्वी विवाह झाला होता. आता ठोंबरे कुटुंबात मयत विकासची पत्नी आणि आई या दोघीच उरल्या असून घर उघड्यावर पडले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

मतदार जनजागृतीसाठी माध्यम संस्थांना निवडणूक आयोगाकडून पुरस्कार


बुलडाणा, दि. 30 : लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्यानिवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्याप्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूकआयोगातर्फे गौरविले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मुद्रित माध्यम, दूरचित्रवाहिनी, रेडिओ आणि ऑनलाईन(इंटरनेट)/सोशल मीडिया या चार गटात हे पुरस्कार देण्यात येतील.लोकशाहीबळकटीकरणासाठी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात जनजागृती, सर्वसामान्यांमध्ये मतदान जागृती व मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्याप्रसारमाध्यम संस्थांना 25 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनकार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. मतदार जागृती मोहीम, मोठ्या प्रमाणातील विशेष प्रसिद्धी, जनतेवर पडलेला प्रभाव यानिकषांवर पुरस्कारांची निवड करण्यात येईल. त्यासाठी माध्यम संस्थांनी 31 ऑक्टोबर2019 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन भारत निवडणूकआयोगाचे अवर सचिव (संवाद) श्री. पवन दिवाण यांनी केले आहे.प्रसारमाध्यमांनीइंग्रजी आणि हिंदीमधून प्रवेशिका पाठवाव्यात. इतर कोणत्याही भाषेतून यास्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवता येईल. मात्र त्यासोबत इंग्रजीतून भाषांतर केलेलीप्रत सोबत जोडावी लागेल. संपर्क - श्री. पवन दिवाण, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली – 110001, ईमेल- media.election.eci@gmail.com, अथवा diwaneci@yahoo.co.in, दूरध्वनी क्र. 011-23052133.

हेक्टरी 50 हाजार रूपये शेतकऱ्यांना मदत दया माजी खा.सुरेश जाधव याची मागणी


 आरूणा शर्मा


पालम :- तालुक्यातील शेतकऱ्याचे प्रचंड नुकसानाचे निवेदन दि.30 ऑक्टोबर रोजी दिले आहे मागील दहा दिवसा पासून तालुक्यात प्रथमच सतत पाऊस चालू असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. यावर्षी सारखा पाऊस दिवाळीत कधीच झाला नाही. दिवाळीत पाऊस पडेल याची कधी शंका देखील व्यक्त केली नाही. यावर्षी मात्र शेतकर्यांच्या तोंडी आलेला घास मात्र निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे.या शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत करून संकटातून बाहेर काढावे अशी मागणी माजी खाजदार सुरेशराव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकातून तालुका प्रशासनाला केली आहे. पुढे बोलतांना जाधव म्हणाले की,बळीराजाने आपली संपूर्ण शेतातील कामे ही आटोपून शेतकरी आनंदात दिवाळी सण साजरा करण्यासाठी आतुर होता.मात्र या आनंदावर पावसाने विरजण करून शेतकऱ्याला हवालदिल केले आहे.अजूनही शेतात सोयाबीन पिकांची गंजी लावून आहे. त्याला अति प्रमाणात पाऊस पडल्याने शेवटी कोंब फुटून सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. असाचपाऊस पडत राहिला तर रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून शेतकऱ्यांना आताच महसूल विभागाने सर्वेक्षण करून हेक्टरी 50, 000 मदत द्यावी व पालम तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा आसे मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी मा.हिदायतूल्ला खॉ पठाण माजी सभापती पं.स.पालम, वसंतराव सिरस्कर रा.कॉ ता.आध्यक्ष, जिय्याखॉन पठाण, साहेबराव जाधव, रत्नाकर शिदे, नुरखॉन पठाण, उत्तमराव गादगे, शेख मोसीन, मधुकर जाधव, गंगाधर करवर, भाऊसाहेब पौळ, गजानन पौळ, इमदाद खॉन पठाण, दत्तराव पौळ, गोविदराव कदम, शेख नाजर, विठ्ठल कदम, काशीनाथ गाडे, शेख रोसन, शेख मोसीन, महमद चाऊस, शेख हबीब या सह तालुक्याचे शेतकरी उपस्थित होते.