तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

वालचंद उदगीरकर यांचे दुःखद निधन; आज दुपारी 1 वाजता होणार अंत्यसंस्कारविशाल उदगीरकर यांना पितृशोक

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
येथील हालगे गल्ली भागातील ज्येष्ठ नागरिक वालचंद शंकरराव उदगीरकर वय 65 वर्ष यांचे आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजता दुःखद निधन झाले.

हालगे गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक वालचंद शंकरराव उदगीरकर यांचे आज बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पहाटे तीनच्या दरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षे वयाचे होते. वालचंद उदगीरकर हे अत्यंत मनमिळावू स्वभावी व धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने सर्व परिचित होते. परळी येथील फोटोग्राफर अनिल, राहुल व विशाल उदगीरकर यांचे ते वडील होत. वालचंद उदगीरकर यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, चार बहिणी, तीन मुले, एक मुलगी, सुन, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. दरम्यान आज बुधवारी दुपारी 1 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment