तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

वाढदिवस उपक्रमातून विद्यार्थी कडून तब्बल 100 झाडांची लागवड




प्रतिनिधी
पाथरी:-जायकवाडी परिसरातील गोदावरी दुधना इंग्लिश स्कूल पाथरी नेहमी काहीतरी वेगळे करण्यास प्रसिद्ध आहे. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी एक वेगळा उपक्रम "मेरे जन्म दिन का एक निशाण,मेरा पेड मेरी पहेंछान"
वाढदिवसानिमित्त केक न कापता  विद्यार्थ्यांच्या उंचीप्रमाणे झाडे लाऊन वाढदिवस साजरा करावे,असे जी डी स्कूल चे संचालक शेख सलिम यांनी विद्यार्थ्यांना सूचित केल्या नंतर जवळपास शंभर झाडांची लागवड पुर्ण झाली.या सर्व विद्यार्थ्यांना नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आले.

 या उपक्रमाला शाळेतील विद्यार्थी व पालकांन कडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व बघता बघताच अल्पकाळातच तब्बल शंभर झाडांची लागवड या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली, या उपक्रमाने शाळेचे सोंदर्य दुपट्टी ने वाढले असून निसर्गा ला ही या वाढत्या वृक्षाची साथ भविष्यात नक्की मिळेल असे दिसून येत आहे,या वृक्षांची काळजी करता शाळेने ठिबक द्वारे पाणी पुरवठा खत व जन्मभूमी फौंडेशन कडून मिळालेली ट्री गार्ड लावून झाडेंचे सौरक्षण केले आहे.
 या उपक्रमाचं कौतुक नक्कीच तालुकास्तरावर नाहीतर जिल्हास्तरा वर होत आहे असे शाळेचे संचालक शेख सलिम यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment