तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

स्ट्रॉगरुमच्या 100 मीटर परीसरात प्रवेशास निर्बंध      परभणी, दि. 19 :- भारत निवडणूक आयोगाने  विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला असुन दिनांक , 21 सप्टेंबर 2019 पासुन आदर्श आचारसंहीता लागु केली आहे . परभणी जिल्हयात खालील ठिकाणी विधानसभा मतदार संघ निहाय सुरक्षा कक्ष ( Strong room ) स्थापन करण्यात आले आहेत , दिनांक . 21  ऑक्टोबर 2019 रोजी मतदान प्रक्रीया पार पडल्या नंतर सर्व मतदान यंत्र ( इव्ही एम ) सुरक्षित ठेवण्यासाठी 1 ) 95 - जिंतूर , शासकीय तंत्र निकेतन ( ITI )  औंढा रोड जिंतूर , 2 ) 96 -परभणी , कृषि अभियांत्रीकी महाविदयालय , वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी , 3 ) 97- गंगाखेड , संत जनाबाई महाविद्यालय , कोद्री रोड गंगाखेड 4 ) 98 - पाथरी शासकीय तंत्र निकेतन ( ITI ) , विटा रोड पाथरी या ठिकाणी दिनांक , 24 ऑक्टोबर , 2019 रोजी मतमोजणीची प्रक्रीया पार पडणार आहे . त्यामुळे सदरील स्ट्रॉगरुमचे 100 मिटरचे परीसरात कोणत्याही व्यक्तीस / वाहनास / फेरीवाल्यास प्रवेश करण्यास , तसेच तात्पुरती किरकोळ मालाची दुकाने / खादयगृह थाटण्यावर निबंध घालणे आवश्यक असल्याबाबत माझी खात्री झालेली आहे . त्याअर्थी परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी . शिवशंकर यांनी फौजदारी व्यवहार प्रक्रिया 1973 चे कलम 144 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन उपरोक्त नमुद ठिकाणी स्थापन केलेल्या स्ट्रॉगरुमच्या 100 मिटरचे परीसरात कोणत्याही व्यक्तीस / वाहनास / फेरीवाल्यास प्रवेश करण्यास , तसेच तात्पुरती किरकोळ मालाची दुकाने / खादयगृह थाटण्यावर  तसेच सर्व सार्वजनिक टेलीफोन / एसटीडी / आयएसडी । भ्रमणध्वनी ( मोबाईल ) , फॅक्स केंद्र , झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके वापरास निर्बंध घालण्यात आले आहेत . आदेश दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 8  वाजेपासुन ते दिनांक 24  ऑक्टोबर 2019 रोजी रात्री 12 वाजेपावेतो लागु राहतील तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्याने या आदेशाची प्रसिध्दी दंवडीव्दारे / ध्वनीक्षेपकाव्दारे तसेच इतर सर्व प्रसिध्दी माध्यमाव्दारे पोलिसांनी करावी, असेही आदेशात नमूद आहे .
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment