तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

घरी प्रसूती झालेल्या महिलेच्या मदतीसाठी धाऊन आली रुग्णवाहिका 108परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातील माणिकनगर येथील सौ उज्वला उदावंत. या महिलेला रात्री 2 वाजेपासून प्रसूती वेदना होत होत्या परंतु संबधित महिलेने थोडं दुर्लक्ष केलं परंतु अचानक पहाटे  4 च्या दरम्यान या महिलेची प्रसूती राहत्या घरामध्ये झाली असा प्रसंग त्या कुटुंबातील सदस्यांनी प्रथमच अनुभवलेला असल्यामुळे घरच्या सदस्यांची धावपळ उडाली एवढ्या पहाटे कोणते ऑटो रिक्षा नाही किंवा कोणतीच मदत मिळत नव्हती नवजात बाळ आईच्या पायापाशी पडलेलं होत बाळाची नाळ कापायची राहिली होती अशातच शेजाऱ्यांनी त्यांना आपत्कालीन रुग्णवाहिका 108 ला संपर्क करण्याचा सल्ला दिला त्यांनी लगेच संपर्क साधला व घडलेल्या प्रसंगाची माहीत समोरील डॉ अमोल चाटे यांना दिली डॉक्टरांनी घटनेचं गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ रुग्णवाहिका चालक काशिनाथ घुगे यांच्या समवेत माणिकनगर येथील... यांच्या घरी गेले व काही मिनिटांच्या आत बाळाला त्याच्या आई पासून सुखरूप वेगळं केलं डॉ अमोल चाटे यांनी बाळाची व आईची तपासणी करून पुढील उपचाराकरिता परळी उपजिल्हारुग्णालयात दाखल केले या संपूर्ण प्रकारानंतर उदावंत कुटुंबियांनी व शेजाऱ्यांनी अतिशय भावुक होत रुग्णवाहिका 108 मधील डॉ अमोल चाटे व चालक काशीनाथ घुगे यांचे आभार मानले.

1 comment:

  1. Very nice Dr. Amol chate & Driver Ghuge. Keep it up..

    ReplyDelete