तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ परळीत आज 12 बलुतेदारांचा निर्धार मेळावापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.11........... परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांना सर्व समाज घटकातून मोठा पाठींबा मिळत असून, समाजातील 12 बलुतेदारांनीही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय केला असून, त्यांच्या विजयाचा निर्धार करण्यासाठीच शनिवार दि.12 ऑक्टोबर रोजी परळीत 12 बलुतेदारांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

सकाळी 11 वाजता आर्य वैश्य मंगल कार्यालयात होणार्‍या या मेळाव्यास स्वतः धनंजय मुंंडे हे मार्गदर्शन करणार असून, मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सतिश कसबे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री पंडीतराव दौंड, माकपचे नेते कॉ.पी.एस.घाडगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.अनिल मुंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, काँग्रेस शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, उपाध्यक्ष सुरेशअण्णा टाक हे उपस्थित राहणार आहेत.

या शिवाय महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मराठवाडा अध्यक्ष युवराज शिंदे, सोनार समाज प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष राजेश पंडीत, कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे, 12 बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कानगावकर, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव चव्हाण, गवळी समाजाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना बागवाले, वडार समाज संघटनेचे राज्य सचिव संजय देवकर, सुतार समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुबप्पा पांचाळ, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय संघटक कवीराज कचरे आदी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यास समाजातील 12 बलुतेदार समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आहवान संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुरेंद्रभैय्या कावरे, सोनार समाज संघटना, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, परीट समाज संघटना, भावसार समाज संघटना, विश्वकर्मा समाज संघटना, गोंधळी समाज संघटना, लोहार समाज संघटना, गुरव समाज संघटना, शिंपी समाज संघटना आदींच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment