तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

परळी विधानसभेसाठी 16 उमेदवार रिंगणात तर 12 उमेदवारांची निवडणूक रिंगणातून माघारपरळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-
अर्ज छाननीतुन वैध ठरलेल्या 28 उमेदवारांपेकी 12 जणांनी माघार घेतल्याने 16 जण निवडणुक रिंगणात राहिले असुन  वंचित बहुजन आघाडी,बसपा,टिपु सुलतान पक्ष या पक्ष्याचे उमेदवार निवडणुक रिंगणात असले तरी भाजपाच्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 परळी विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढविणार्या उमेदवारांपेकी अर्ज छाननीनंतर धनंजय मुंडे (राष्ट्रवादी),पंकजा मुंडे (भाजपा),भिमराव मुंजाजी सातपुते(वंचित बहुजन आघाडी),अशोक संतराम ताटे(आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी),भागवत बबनराव वैद्य(बीड विकास इंडिया पार्टी),अनंत वैजनाथ गायकवाड (बीएसपी),सादिक मुनीरत्न शेख,(टिपू सुलतान पार्टी) या पक्षासह सौ.राजश्री धनंजय मुंडे, लिंबाजी अंबाजी मुंडे,नबी साहब साहाब सय्यद,बद्दीन बाबुमियाँ शेख,सिराजोद्दीन काझी,हिदायत सादेक सय्यद अली,मतीन समदानी शेख,एजाज बाबर इस्माईल शेख,सुलेमान खैरूद्दीन मोहम्मद,मुस्तफा मैनोद्दीन शेख,रईसोददीन जलालोद्दीन पठाण,फिरोजखान पठाण खैराती खान,प्रविण सोपान मस्के,भागवत रामकृष्ण काकडे,रसूल खान अफसर खान पठाण,धनंजय सदाशिवराव देशमुख, डॉ.वसंत रघुनाथ मुंडे,साजित इब्राहीम सय्यद,फिरोज आसेफ शेख,जावेद उस्मान शेख, पठाण सरमतखान सुफीखान या एकुण 28 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.या 28 जणांपैकी 12 उमेदवारांनी माघार घेतल्याने धनंजय मुंडे- राष्ट्रवादी,पंकजा मुंडे भाजपा,भिमराव मुंजाजी सातपुते, वंचित, भागवत बबनराव वैद्य, बीड विकास इंडिया पार्टी,अनंत वैजनाथ गायकवाड, बीएसपी,सादिक मुनीरत्न शेख,टिपू सुलतान पार्टी,नबी साहब साहाब सय्यद,अपक्ष,सिराजोद्दीन काझी,अपक्ष, हिदायत सादेक सय्यद अली,अपक्ष,एजाज बाबर इस्माईल शेख,अपक्ष,रईसोददीन जलालोद्दीन पठाण, अपक्ष,फिरोजखान पठाण खैराती खान अपक्ष,प्रविण सोपान मस्के,अपक्ष,भागवत रामकृष्ण काकडे,अपक्ष,धनंजय सदाशिवराव देशमुख,-अपक्ष डॉ.वसंत रघुनाथ मुंडे, अपक्ष हे 
16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.

No comments:

Post a comment