तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जिल्ह्यात 16 उमेदवारांची निवडणूक रिंगणातून माघारमाघारीनंतर 59 उमेदवार रिंगणात

 बुलडाणा, दि. 7 :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता जिल्ह्यात उमेदवारी अर्ज छाननी केल्यानंतर 75 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आज 7 ऑक्टोंबर 2019 रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी जिल्ह्यात 16 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. यामुळे जिल्ह्यात आता 7 विधानसभा मतदारसंघात 59 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भाग्याचा फैसला 21 ऑक्टोंबर रोजी मतदार करणार आहेत.

   विधानसभा मतदारसंघनिहाय माघार घेतलेले उमदेवार व निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे : 21- मलकापूर : माघार घेतलेले उमेदवार अजय सिताराम भिडे व संजय पुंडलिक दाभाडे. राहीलेले उमेदवार 11 - प्रवीण रमेश गावंडे (अपक्ष), राजेश पंडीतराव एकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), बळीराम कृष्णा धाडे (अपक्ष), शेख आबीद शेख बशीर (अपक्ष), नितीन वसंतराव नांदुरकर (वंचित बहुजन आघाडी), विजय प्रल्हाद गव्हाड (अपक्ष),  दत्ता गजानन येनकर (अपक्ष), चैनसुख मदनलाल संचेती (भारतीय जनता पार्टी), अवकाश कैलास बोरसे (अपक्ष),  अ. मजिद कुरेशी अ. कदीर (एआयएमआयएम), प्रमोद यादव तायडे (बहुजन समाज पार्टी).

22- बुलडाणा : माघार घेतलेले उमेदवार निरंक. राहीलेले उमेदवार 7 - अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार (बहुजन समाज पार्टी), संजय हरीभाऊ गायकवाड (शिवसेना), हर्षवर्धन वसंतराव सपकाळ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मोहम्मद सज्जाद अब्दुल खालीक (एआयएमआयएम), विजय हरीभाऊ शिंदे (वंचित बहुजन आघाडी), योगेंद्र राजेंद्र गोडे (अपक्ष), विजय रामकृष्ण काळे (अपक्ष).

23- चिखली : माघार घेतलेले उमेदवार खालीद अहमद खान तालीब खान व  निसार अ. कादर शेख.  राहीलेले उमेदवार 10 - परवीन सय्यद  हारूण सय्यद (बहुजन समाज पार्टी), राहुल सिद्धिविनायक बोंद्रे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), श्वेता विद्याधर महाले (भारतीय जनता पार्टी), अशोक शिवसिंग सुरडकर (वंचित बहुजन आघाडी), अब्दुल सलीम अब्दुल नुर मोहम्मद मेमन (अपक्ष), इम्रानखान उमरखान (अपक्ष), दगडूबा शंकर साळवे (अपक्ष), दादाराव श्रीराम पडघान (अपक्ष), देवानंद पांडुरंग गवई (अपक्ष), राजेंद्र विश्वनाथ जवंजाळ (अपक्ष).

24- सिंदखेड राजा : घेतलेले उमेदवार विनोद लक्ष्मण वाघ, डॉ गणेश बाबुराव मांटे, समाधान त्र्यंबक वाघ, वाजीदखान मोबीनखान पठाण आणि तारामती बद्रीनाथ जायभाये. राहीलेले उमेदवार 10 - डॉ शशिकांत नरसिंगराव खेडेकर (शिवसेना), सविता शिवाजी मुंडे (वंचित बहुजन आघाडी), शिवशंकर दत्तात्रय वायाळ (बहुजन समाज पार्टी), प्रविण श्रीराम मोरे (अपक्ष), विकास प्रकाश नांदवे (अपक्ष), राजेंद्र उत्तमराव शिंगणे (अपक्ष), भागवत देविदास राठोड (अपक्ष), डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), एकनाथ नरेंद्र देशमुख (अपक्ष), श्रीकृष्ण उत्तम डोळस (अपक्ष).

25- मेहकर : माघार घेतलेले उमेदवार समाधान देवराव साठे.  राहीलेले उमेदवार 5 - अनिल देवराव खडसे (बहुजन समाज पार्टी), अनंता सखाराम वानखेडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), संजय भास्कर रायमूलकर (शिवसेना), आबाराव श्रीराम वाघ (वंचित बहुजन आघाडी), लक्ष्मण कृष्णाजी मानवतकर (अपक्ष).

26- खामगांव : माघार घेतलेले उमेदवार गणेश जगन्नाथ चौकसे व कैलास फाटे.  राहीलेले उमेदवार 12 - रमेश केशवराव खिरडकर (अपक्ष), शरद सुखदेव वसतकार  (वंचित बहुजन आघाडी), श्याम बन्सीलाल शर्मा (अपक्ष), ॲड आकाश पांडुरंग फुंडकर (भारतीय जनता पार्टी), ज्ञानेश्वर पुरूषोत्तम गणेश (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), उद्धव ओंकार आटोळे (अपक्ष), दिलीप मनोहर भगत (बहुजन समाज पार्टी), भिमराव हरीश्चंद्र गवई भिमराज सेना (अपक्ष), अजमतउल्लाखान रहेमतउल्लाखान (अपक्ष), आकाश देविदास गवई (अपक्ष), शब्बीरखा गुलशेरखा (अपक्ष), मोहम्मद अजहर मोहम्मद शौकत (टिपू सुलतान पार्टी).

27- जळगांव जामोद : माघार घेतलेले उमेदवार प्रसेनजित किसनराव तायडे, प्रशांत काशीराम डिक्कर, शरद शिवाजी बनकर आणि शेख मुस्ताक शेख दस्तगीर.  राहीलेले उमेदवार 4 - डॉ. संजय श्रीराम कुटे (भारतीय जनता पार्टी), संगीतराव भास्करराव भोंगळ (वंचित बहुजन आघाडी), डॉ स्वाती संदीप वाकेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रशांत रमेश दत्तु नवथळे (बहुजन समाज पार्टी).

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment