तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी परतुर येथे 16 ऑक्टोबरला सभेचे आयोजन
पोलीस अधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी

परतूर:

आशिष धुमाळ

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परतुरात दि.16 ऑक्टोबरला भाजप उमेदवार पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले आहे, सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहतील या दृष्टिकोनातून आज पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्यासह पोलीस अधीक्षक व अधिकारी यांनी शहरातील संभावित स्थळांची पाहणी केली. 
शहराच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमता:च पंतप्रधान येत असल्याने अपेक्षित सुरक्षाच्या दृष्टीने व येणाऱ्या जनसमुदायच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून योग्य स्थळ व गर्दी मावेल असे मैदान पाहण्यासाठी आज भाजप उमेदवार बबनराव लोणीकर, प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी पोलीस अधिकारी यांना स्थळ दाखवले, जैन मंदिर ते बीएसएनएल आॅफीस दरम्यान असलेल्या नियोजित जागेची तसेच वाहनांच्या पार्किंग साठी जागांची पाहणी केली  या वेळी ना.बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर, पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक एस चैतन्य, पोलीस अधिकारी समाधान पवार, सी, डी, शेवगण, उपविभागिय अधिकारी  बांगर, पोलिस निरीक्षक शिरीक्ष हुंबे, सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी व अभियंता युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment