तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 23 October 2019

दुपारी 1 नंतर परळी मतदारसंघात वाढला मताचा टक्का


2 लाख 23 हजार मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार
24 ऑक्टोंबर रोजी होणार्‍या मतमोजणीकडे लागले सर्वांचे लक्ष
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
परळी विधानसभा मतदारसंघासाठी काल दि.21 ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडले. काल आणि परवा परळी तालुक्यात चांगला पाऊस पडला 21 ऑक्टोंबर रोजी पहाटे पासुनच संततधार पाऊसास सुरुवात झाली होती. याचा परिणाम सकाळी मतदानावर झाला. सकाळी 1 वाजेपर्यंन्त मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी नव्हती. सुमारे 26 टक्के मतदान या दरम्यान झाले होते. परंतु पाऊसाने उघाड दिल्यानंतर मात्र परळी मतदार संघात 73 टक्के मतदान झाले. 3 लाख 6 हजार 204 मतदारां पैकी सुमारे 2 लाख 23 हजार मतदारांनी आपला भावी आमदार कोण यासाठी मतदानाचा अधिकार बजावला.
संपुर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोर धरला होता. याचा परिणाम मतदानावर होतो की काय अशी भिती सर्वच राजकिय पक्षांना सतावत होती. 233 परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याठिकाणी 16 उमेदवार आपले नशिब आजमावत असले तरी मुख्य लढत ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातच होती.
सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात झाली. त्यावेळी परळी तालुक्यात पाऊस सुरु होता. त्यामुळे मतदार मतदान केंद्राकडे फिरकला सुधा नाही. दुपारी 1 वाजेपर्यंन्त ही परिस्थिती कायम होती. परंतु पाऊस उघडल्यानंतर मात्र मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसु लागल्या. तसेच सायंकाळी 6 वाजेपर्यंन्त मतदानाची टक्केवारीही वाढली. एकुण परळी मतदार संघासाठी 73 टक्के मतदान झाले. ना.पंकजाताई मुंडे, ना.धनंजय मुंडे यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. 24 ऑक्टोेंबर रोजी होणार्‍या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a comment