तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 October 2019

परळी मतदारसंघाला पहिल्या 20 विकसित मतदारसंघात स्थान मिळवून देणार; जायकवाडीचे पाणी, परळी-अंबाजोगाई रस्ता, बायपास, एम.आय.डी.सी. करणार धनंजय मुंडेेंचे जाहिरनाम्याद्वारे परळीतील जनतेला अभिवचन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.15............. परळी विधानसभा मतदारसंघातील मुलभूत विकास प्रश्न, समस्या सोडवून या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्याबरोबरच शेतकरी, कष्टकरी यांच्या जीवनात आर्थिक प्रगती आणण्याचे वचन देत, या मतदारसंघाला राज्यातील पहिल्या 20 विकसित मतदारसंघात स्थान मिळवून देण्याचे अभिवचन देणारा जाहिरनामा परळी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने मतदारांच्या हाती देण्यात आला आहे, हा वचननामा परळी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली प्रतिज्ञानच असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
गेल्या 25 वर्षांपासून राजकारण, समाजकारण व मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून परळीत नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवण्याबरोबरच विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. अनेक समाजोपयोगी कामे धनंजय मुंडे यांनी केली आहेत. या विधानसभेच्या निवडणूकीत श्री.मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षांच्यावतीने निवडणूक लढवत आहेत. या निमित्ताने जनतेच्या हाती देण्यात आलेला जाहिरनाम्यात मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलून येथील बेरोजगार, महिला, विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, कामगार  यांचे जीवनमान बदलण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जायकवाडीचे पाणी वाण धरणात आणण्याचा परळी-अंबाजोगाई तालुक्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा, कृषीवर आधारित व्यवसाय, उद्योग उभारण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्धार करण्यात आला आहे, बेरोजगारांना हाताला काम मिळावे म्हणून पंचतारांकीत एम.आय.डी.सी. उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 

परळी मतदारसंघातील सिरसाळा, घाटनांदूर, धर्मापूरी, बर्दापूर अशा मोठ्या गावांना नगर पंचायतींचा दर्जा परळीसह वरिल गावांत नवीन बसस्थानकांची निर्मिती करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासनही या वचननाम्यात आहे. प्रदुषणमुक्त परळी करण्याबरोबरच परळी-मुंबई रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. परळी-अंबाजोगाई रस्ता, बायपास, खडक्याचे पाणी परळीकरांना उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे या वचननाम्यात सांगण्यात आले आहे. परळी बाजारपेठेला गतवैभव प्राप्त करून देण्याबरोबरच येथील व्यापार्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी, भाजी मंडईचे नूतनीकरण व स्वतंत्र आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा केंद्र सरकारच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या सूचित समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन या जाहिरनाम्यात आहे. परळीतून आषाढी कार्तिकीला पंढरपूरकडे जाणार्‍या तसेच कपिलधार यात्रेसाठी जाणार्‍या भाविक-भक्तांसाठी, वारकर्‍यांसाठी स्वतंत्र वारकरी भवन निर्माण करण्याचे व वैद्यनाथ मंदिर केंद्रस्थानी ठेवून येथे भव्य पर्यटन केंद्र उभारण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. 

उपजिल्हा रूग्णालयातील खाटांची क्षमता वाढवणे व तिथे सर्व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे, वीज ग्राहकांच्या समस्या सोडवणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढवणारा पॅटर्न उभा करणे, शालेय विद्यार्थीनींना सायकल व एज्युकेशन टॅब देण्याचे आश्वासन, युवकांचे आरोग्य सदृढ व्हावे यासाठी व्यायाम शाळा, जीम उभारण्याचे आश्वासनही या जाहिरनाम्यात आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड महामंडळाचे कार्यालय परळीत सुरू व्हावे, मतदारसंघातील वीट उद्योग स्वतंत्र जागेत निर्माण व्हावा, वीज केंद्र अखंडपणे सुरू रहावे, चांदापूर तलावातून परळीसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही या वचननाम्यात देण्यात आले आहे. 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी शहरासह मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलणारा, औद्योगिकीकरणाचा पाया घालणारा, युवकांना दिशा देणारा, त्यांना स्वावलंबी करणारा, महिलांसह, शेतकरी, कष्टकरी यांचे प्रश्न सोडविण्याचे वचन देणारा हा जाहिरनामा आहे, अशी प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरिक हा जाहिरनामा वाचून व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a comment