तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 October 2019

मतदारांची गाऱ्हाणे ऐकण्यासाठी निवडणूक निरीक्षक 24 ऑक्टोंबरपर्यंत उपलब्ध असणारबुलडाणा, दि. 6 : बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (सामान्य) डॉ पी. सुरेश बाबु यांचे बुलडाणा विधानसभा मतदारंसघात आगमन झाले आहे. त्यांचा भ्रमणध्वनी 7588087955 आहे. या क्रमांकावर मतदारांना संपर्क साधता येणार आहे. सदर निवडणूक निरीक्षक मतदारांचे  गाऱ्हाणे, अडचणी व सुचना ऐकण्यासाठी बुलडाणा शासकीय विश्रामगृह येथे 24 ऑक्टोंबर पर्यंत सकाळी 10.30 ते 11.30 या कालावधीत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) उपलब्ध असणार आहे.तरी मतदारांनी याबाबतची नोंद घेवून  त्यांना काही अडचण, सुचना असल्यास त्यांना प्रत्यक्ष भेटून आपले म्हणणे मांडता येणार आहे, असे  निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी प्रसिद्धरी पत्रकान्वये कळविले आहे.

जमील पठाण

No comments:

Post a comment