तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

भाजप नेत्यासह कुटुंबावर गोळीबार, 5 जणांचा मृत्यू



भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला आहे.
 भाजप नेत्यासह कुटुंबावर गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

*भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला आहे.
भुसावळ, 07  ऑक्टोबर : भुसावळमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आह. 
रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. जेव्हा नगरसेवक रवींद्र हे त्यांच्या कुटुंबासोबत घरी होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर रविंद्रच्या घरी देशी पिस्तूल, चाकू घेऊन घुसले आणि गोळ्या झाडल्या. हल्ला करुन हल्लेखोर तिथून पळून गेले पण नंतर त्यांनी आत्मसमर्पण केलं.
हल्ल्यात वापरलेली शस्त्रे घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या गोळीबारात जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. या घटनेमागील खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.





जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment