तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

50 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुपरस्टार शहेनशाह अमिताभ बच्चन चे खास कौतुकमुंबई (प्रतिनिधी) :- 
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा गोव्यात रंगणार आहे. विशेष म्हणजे, १९५२साली सुरू झालेल्या या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदाचे ५०वे वर्ष आहे. गोव्यात रंगणाऱ्या चित्रपट महोत्सवात दोनशेहून अधिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सर्वांचे लाडके सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना ह्यावर्षी  दादासाहेब फाळके जाहीर झाला आहे, त्यामुळे रसिकांना खुश करण्यासाठी ईफ्फीत अमिताभ बच्चन यांचे दर्जेदार चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या विशेष उपस्थिती साठी ईफ्फी प्रयत्नशील आहे.
50 व्या वर्षांपूर्वीचे चित्रपटांचे विशेष प्रदर्शन दरवर्षी प्रमाणे ईफ्फी महोत्सव २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांबरोबर काही भारतीय प्रादेशिक भाषांतील एकूण २६ चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, इतर १५ नॉन फिचर म्हणजेच लघुचित्रपटही दाखवण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे ईफ्फीचे यंदाचे पन्नासावे वर्षाचे औचित्य साधून ५० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले काही चित्रपट ही प्रदर्शित होणार आहेत. चित्रपट महोत्सवाचे हे पन्नासावे वर्ष असल्यामुळे यंदाच्या ईफ्फीवर नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर स्वतः जातीने लक्ष घालून महोत्सव मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a comment